News & View

ताज्या घडामोडी

IMG 20250917 WA0014

टचप काढायला मि येतो!अजित दादांनी अधिकारी, गुत्तेदाराला झाप झाप झापलं!

बीड -राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे त्यांच्या कडक शिस्तीच्या स्वभावामुळे आणि तोंडावर चुका काढून झापण्याच्या शैलीमुळे सर्वत्र परिचित आहेत. याचा अनुभव बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच गुत्तेदारांना आला. जिल्हा रुग्णालयातील कॅथ लॅब च्या उदघाट्न प्रसंगी आला.दरवाजाला लावलेले स्क्रू वेगवेगळे का आहेत,वर्क अंडर प्रोसेस आहे तर उदघाट्नला कशाला बोलावले, सिमेंट पॅच कसकाय राहिला, मि दुपारी येतो अन पॅच करतो असं म्हणत दादांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमापूर्वी जिल्हा रुग्णालयात उभारलेल्या कॅथ लॅब चे उदघाट्न केले. यावेळी बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय राऊत, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, आ संदीप क्षीरसागर यांची उपस्थिती होती.

यावेळी लॅब ची पाहणी करताना दरवाजाला लावलेल्या स्क्रू ची बारकाईने पाहणी करत हे स्क्रू वेगवेगळे का लावले आहेत. काही ठिकाणी स्क्रूच लावले नाहीत असं म्हणत असं कसं कामं करता. आम्ही पैसा देतो तो जनतेच्या टॅक्स मधून येतो, जनतेच्या सोयीसाठी दिलेला पैसा योग्य पद्धतीने खर्च झाला पाहिजे.

fb img 17580986334919020696485181900953

आम्ही टक्केवारी घेत नाहीत असं म्हणत कोण गुत्तेदार आहे असे विचारले. यावेळी गुत्तेदाराने मि कामं केले आहे, मात्र कामं अंडर वर्क आहे असं सांगितल्यावर अंडर वर्क आहे तर उदघाट्नला कशाला बोलावले असा सवाल केला. यावेळी मागे उभे असलेल्या जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी बिल्डिंग हॅन्ड ओव्हर झाल्याचे सांगितले.

त्यानंतर दादा आत रूममध्ये गेले तेव्हा मशीन शेजारी असलेल्या बेडवरील चादर खोचलेली दिसली त्यावरून त्यांनी झापले. तसेच एसी च्या खाली सिमेंट चा पॅच का दिला नाही ते खराब कामं आहे असं म्हटलं. यावेळी डॉ राऊत यांनी ते राहील आहे करून घेतो अशी सारवा सारव करण्याचा आणि वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा चिडलेल्या दादांनी मि दुपारी रेल्वेचे उदघाट्न झाले कि हातात थापी घेऊन येतो आणि पॅच करून घेतो असं म्हणत हर तुमचं अन माझं कामं नाही, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता यांचे कामं आहे, ते कुठं आहेत असं म्हणत कामं नीट करा नाहीतर मि ब्लॅक लिस्ट करील असा सज्जड दम दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *