बीड -जिल्ह्यात गेल्या चार दिवसात झालेल्या पावसामुळे पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे तसेच तीन लाख पन्नास हजार जिरायत आणि 15 हजार हेक्टर बागायत शेतीचे नुकसान झाले आहे. पावसाचा फटका बसल्याने एक हजार गावे बाधित झाली असून 85 जनावरांचा मृत्यू झाला आहे.
बीड तालुक्यातील 15 मंडळात अतिवृष्टी झाली. 14 सप्टेंबर रोजी आष्टी तालुक्यातील दोन व्यक्ती पुरात वाहून गेल्याने मृत्यूमुखी पडल्या. 57 दुधाळ जनावरांचा तर 19 लहान जनावरांचा मृत्यू झाला. 8 अन्य ओढकाम करणारी व 1 लहान जनावर अशा एकूण 85 जनावरांचा मृत्यू झाला. अतिवृष्टीमुळे शिरुर तालुक्यातील 20 घरांची पडझड झाली तर 122 कच्च्या घरांची पडझड झाली. जिल्ह्यातील 1 हजार 31 गावे पुराने बाधित झाली असून बाधित शेतकऱ्यांची संख्या 5 लाख 30 हजार 122 इतकी आहे. 3 लक्ष 47 हजार 722 जिरायती शेतीचे, 15 हेक्टर बागायती शेतीचे असे एकूण 3 लाख 47 हजार 737 हेक्टवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 85 शाळांची अतिवृष्टीमुळे पडझड झाली असून नुकसानीच्या दुरुस्तीसाठी अंदाजे 2 कोटी 63 लक्ष रुपये खर्च अपेक्षित












Leave a Reply