News & View

ताज्या घडामोडी

images 16 2024 01 02T210720.790

दादा, बी एन्ड सी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे लक्ष द्या!

कोट्यावधीची कामे कागदावर, बिल अधिकारी, गुत्तेदाराच्या खिशात!

बीड – राज्याचा आर्थिक नियोजन लावण्याचे जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा या विभागातील शाखा अभियंता पासून ते कार्यकारी अभियंता पर्यंत सगळ्यांनीच शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्याचे धोरण आखले आहे करोडो रुपयांची कामे कागदावर करून गुत्तेदार आणि स्वतःचे उखळ पांढरे करण्याचा उद्योग या अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे.

बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये शाखा अभियंता गव्हाणे ठाकूर भागवत उपाभियंता चंद्रकांत बोराडे आणि कार्यकारी अभियंता रवींद्र तोंडे यांनी धुमाकूळ घातला आहे. जिल्हा रुग्णालय असो किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय अथवा कृषी कार्यालय किंवा इतर सरकारी कार्यालय. या कार्यालयामध्ये देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अक्षरशः पाच-पन्नास कोटी रुपयांचा चुराडा केला आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीवर जवळपास एक कोटी रुपये खर्च दाखवण्यात आला आहे. तसेच नर्सिंग होस्टेल असो किंवा जिल्हा रुग्णालयाचे वेगवेगळे वार्ड या ठिकाणी किरकोळ दुरुस्तीसाठी एक ते दीड कोटी खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे.

अशाच प्रकारे पोलीस अधीक्षक यांचे निवासस्थान असो किंवा बिंदुसरा विश्रामगृह अथवा एसपी ऑफिस मधील वेगवेगळे विभाग या ठिकाणी टॉयलेट दुरुस्ती पासून ते दरवाजे खिडक्या बदलण्यापर्यंत दहा दहा लाखाची कामे दाखवून किमान साडेपाच ते सहा कोटी रुपये गुत्तेदार आणि स्वतःच्या खिशात घालण्याचा उद्योग तोंडे बोराडे व इतरांनी केला आहे.

शासकीय कार्यालयाच्या सेप्टिक टॅंक दुरुस्तीसाठी आणि बसविण्यासाठी तसेच पाईपलाईन दुरुस्तीसाठी गुप्तदारांनी दहा दहा लाख रुपयांची कामे सुचवली आणि अधिकाऱ्यांनी ती मंजूर केली असे प्रकार झाले आहेत.

बीडच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागात देखील असाच सावळा गोंधळ निर्माण झालेला आहे देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली एकच काम तीन वेगवेगळ्या फंडामधून मंजूर करत तिन्ही ठिकाणाहून बिले उचलण्याचे उद्योग झाल्याची माहिती आहे.

बीडच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात देखील जलजीवन योजनेच्या नावाखाली अक्षरशः करोड रुपये अधिकारी आणि गुत्तदारांनी स्वतःच्या खिशात घातले आहेत या सगळ्या गोष्टींकडे अजित पवार लक्ष देणार का हाच खरा प्रश्न आहे.

बीडचे पालकमंत्री पद स्वीकारल्यापासून अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे अनेक विभागांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे मात्र बी अँड सी मध्ये ज्या पद्धतीने अधिकारी उधळपट्टी करीत आहेत त्यांना चाप लावून गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय असले बोगस प्रकार थांबणार नाहीत आता हे सगळे गुन्हे दाखल करण्याचे आदेश अजित पवार देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *