बीड – बोगस शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी गेल्या तीन दिवसापासून बीड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि त्यांच्या दोन कर्मचारी औरंगाबाद उपसंचालक कार्यालयात ठाण मांडून आहेत. बीड जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षक भरती झालेली आहे आता त्याची चौकशी सुरू झाल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना मॅनेज करता येते का? यासाठी संस्था चालक आणि शिक्षण विभागाचे अधिकारी संभाजीनगर मध्ये तळ ठोकून बसले आहेत
नागपूर सहित अमरावती गडचिरोली जळगाव या जिल्ह्यात आठ दहा महिन्यापूर्वी बोगस शालार्थ आयडी तयार करून हजारो शिक्षकांना नोकरी दिल्याचे प्रकरण त्यानंतर या प्रकरणात नियुक्त करण्यात आलेल्या एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी 22 अधिकारी आणि संस्थाचालक शिक्षक यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले
दरम्यान असेच प्रकार मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या भागातही झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा राज्यातील संस्थामध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी स्पेशल एस आय टी स्थापन केली.
या चौकशी मध्ये प्रत्येक जिल्ह्यात 2012 ते 2025 या काळात झालेल्या भरती बाबत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कागदपत्रे ऑनलाईन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान बीड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, राऊत आणि बेंडेकर हे तिघे तीन दिवसापासून छत्रपती संभाजीनगर येथील उपसंचालक कार्यालयात ठाण मांडून बसले आहेत.
जिल्ह्यातील शिक्षकांची कागदपत्रे आणि त्रुटी याबाबत माहिती देण्यासाठी हे अधिकारी गेल्याची माहिती आहे. ज्या ज्या संस्थाचालकांनी बोगस भरती केली आहे त्यानी देखील उपसंचालक कार्यालयात चकरा मारण्यास सुरवात केली आहे.












Leave a Reply