News & View

ताज्या घडामोडी

IMG 20250910 WA0024

शिक्षण क्षेत्रातील महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन!

बीड -शहरातील आयुर गायनिक हॉस्पिटल च्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रातील महिला, शिक्षिका यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये गेल्या पाच दिवसात शंभर महिला, शिक्षिका यांची तपासणी करण्यात आली.

IMG 20250910 WA0024

शहरातील अंबिका चौक भागात लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे नव्यानेच सुरु झालेल्या डॉ रसिका पारगावकर यांच्या आयुर गायनॅक हॉस्पिटल च्या वतीने विशेष शिबीर आयोजित केले आहे.

IMG 20250905 WA0040

शिक्षक दिनी हॉस्पिटल चा शुभारंभ झाल्यानंतर डॉ रसिका यांनी मोफत शिबिराचे आयोजन केले आहे. 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या दरम्यान शहरातील बहुतांश शाळा, महाविद्यालय मधील महिला स्टाफ यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे.सकाळी दहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत हॉस्पिटल मध्ये तपासणी साठी महिलांनी मोठ्या संख्येने यावे असे आवाहन डॉ रसिका यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *