बीड -कोरोना काळात ज्या अधिकाऱ्याच्या गाडीत दारू आणि लाखो रुपये सापडले, गुन्हा दाखल होऊन निलंबन झाले, ज्याच्यामुळे बीड जिल्ह्याचे आरोग्य बिघडले त्या अधिकाऱ्याचा नाद काही कमी झालाच नाही. बाईच्या नादापायी बुलढाण्यात या अधिकाऱ्याला कपडे फाटेपर्यंत मार खावा लागला. वीस पंचवीस लाखाची तोडीपाणी करून प्रकरण मिटवावे लागले. मात्र या प्रकरणाची चांगलीच चर्चा बुलढाणा आणि बीड जिल्ह्यात सुरु आहे.
प्रशासकीय अधिकारी बीडला रुजू होण्यापूर्वी बीड म्हणजे बिहार म्हणून बोंब मारतात, मात्र एकदा रुजू झाल्यानंतर चार पिढ्या बसून खातील एवढं कमावून जातात. असाच एक दिवटा अधिकारी तीन वर्षांपूर्वी बीडला रुजू झाला.
या अधिकाऱ्याचे कारनामे सर्वश्रुत असताना त्याला बीडला आणण्यात आले होते. या महाशयानी जालना येथे असताना लॉक डाऊन च्या काळात गाडीत दारू आणि आठवण दहा लाख रुपये घेऊन फिरताना पोलिसांनी पकडले. त्यावेळी हे महाशय मद्यधुंद अवस्थेत होते. पोलिसांनी गाडीची तपासणी करून गुन्हा दाखल त्यांना अटक देखील केली. या प्रकरणात हे महाशय निलंबित झाले.
त्यानंतर हट्ट करून बीडला आल्यावर यांचे चाळे काही कमी झालेच नाहीत. यांनी बीडमध्ये देखील बेकायदेशीर भरती करून जिल्ह्याचे आणि जिल्हा परिषदेचे आरोग्य धोक्यात आणले. यांच्या काळात बीड जिल्ह्याचे आरोग्य अबाधित राहण्याऐवजी जास्तच बिघडले. जिल्हा परिषदेत कार्यरत असणारे मेडिकल ऑफिसर यांची बेकायदा पदोन्नती असो कि इतर कामे यामुळे हे अधिकारी वादात सापडले.
वर्षभरापूर्वी यांची बदली बुलढाणा येथे झाली. किंबहुना त्यांनी होम टाऊन असल्याने करवून घेतली. गावी गेल्यावर सुद्धा यांचे चाळे आणि थेरं काही कमी झालेच नाहीत. बीडला असताना ज्यांच्यासोबत प्रेमाच्या आणभाका घेतल्या त्यांना धोका दिला.
अखेर ही महिला रणरागिणी बनून बुलढाण्यात दाखल झाली. सोबत असलेल्या दोन चार पहिलवान सोबत या महिलेने त्या अधिकाऱ्याच्या फ्लॅटवर धडक मारली. घरात जाताच घरातील टीव्ही, फ्रिज, सोफासेट, टी पॉय यांची तोडफोड करत या महाशयांना चांगलाच चोप दिला.
अक्षरशः या मारामारीत अधिकाऱ्याचे कपडे फाटले. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. गुन्हा दाखल करून घेण्याची तयारी झाली, परंतु तक्रारदार महिलेने माघार घेतल्याने गुन्हा दाखल न होता हे महाशय सहिसलामत बाहेर पडले.
हे सगळे प्रकरण मिटवण्यासाठी तब्बल वीस ते पंचवीस लाखाची तोडीपाणी झाल्याची माहिती आहे.
आपल्या चर्मोद्योगा मुळे बदनाम झालेल्या या अधिकाऱ्याला हे प्रकरण चांगलेच अंगाशी आले. पैसा तर गेलाच पण बदनामी देखील झाल्याने समाजात चांगलीच बदनामी झाली. हे महाशय बीडच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वादग्रस्त झाले होते.












Leave a Reply