News & View

ताज्या घडामोडी

जयभवानी च्या चेअरमन पदी अमरसिंह पंडित !

गेवराई – जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी अमरसिंह पंडित यांची तर व्हाईस चेअरमन पदी भाऊसाहेब नाटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर चेअरमन अमरसिंह पंडित आणि व्हा. चेअरमन भाऊसाहेब नाटकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. सभासदांनी टकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी नव्या जोमाने आणि तयारीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करत साखरेच्या उत्पादना बरोबर इथेनॉल सारख्या उपपदार्थाचे उत्पादन करुन उसाला विक्रमी भाव देण्याची ग्वाही चेअरमन अमरसिंह पंडित यांनी दिली.

या बैठकीला संचालक सर्वश्री नारायणराव नवले, गणपतराव नाटकर, साहेबराव चव्हाण, शंकरराव तौर, जगन्नाथ शिंदे, आप्पासाहेब गव्हाणे, श्रीराम आरगडे, संभाजी पवळ,कुमारराव ढाकणे, राजेंद्र वारंगे, विजयकुमार घाडगे, नंदकिशोर गोर्डे, रहेमतुल्ला पठाण, बाबुराव काकडे, भिमा मोरे, सौ. संध्या आसाराम मराठे, सौ. शंकुतला संदिपान दातखिळ, जगन्नाथ काळे, रावसाहेब देशमुख यांच्यासह सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी कदम मॅडम, रामचंद्र ठोसर आदी उपस्थित होते.

निवडीनंतर संचालक मंडळाने चेअरमन अमरसिंह पंडित आणि व्हा.चेअरमन भाऊसाहेब नाटकर यांचा सत्कार केला. यावेळी सर्व संचालक मंडळासह, जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप, बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण, उपसभापती विकास सानप, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. *चौकट*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *