विशेष संपादकीय /लक्ष्मीकांत रुईकर
एखाद्या लग्न समारंभात किंवा सार्वजनिक कार्यक्रमात गेल्यानंतर आपल्याला माणसांना मिळो अथवा न मिळो पण जर वाढपी आपला हक्काचा असेल तर पोटभर जेवण मिळतं आणि हक्काने बसायला जागा मिळते असं म्हटलं जातं याचा अनुभव सध्या बीडवासीय घेत आहेत. बारामतीच्या पवारांकडे बीडचा पालकत्व आहे आणि बीड जिल्ह्याची झालेली बदनामी आणि माथ्यावर लागलेला डाग पुसण्यासाठी अजित पवारांसारखा दादा माणूस पहाटे सहाच्या आत आणि रात्री बारा वाजेपर्यंत ऑन फिल्ड काम करत आहे हे पाहून बीडवासीयांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.पुढची पाच वर्ष दादाच बीड जिल्ह्याचे पालक राहावेत आणि चांगल्या कामासाठी जिल्ह्याची ओळख निर्माण व्हावी अशी अपेक्षा तमाम बिडकर व्यक्त करत आहेत.
ज्या जिल्ह्याने गोपीनाथ मुंडे यांच्यापासून ते धनंजय मुंडे यांच्यापर्यंत अनेकांचे नेतृत्व पाहिलं अनुभवलं त्या जिल्ह्याने गेल्या सहा महिन्यापासून अजित पवार नावाच्या नेत्याचं नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व देखील पाहिलं आणि तमाम बीड जिल्हा वाशी यांच्या मनात एकच भावना निर्माण झाली की बीड जिल्ह्यात मोठ मोठे नेते दिले मात्र विकास कुंठीत राहिला आता दादा सारखा माणूस ज्या पद्धतीने झपाटल्यागत काम करू लागला आहे ते पाहता आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत बीड जिल्हा बारामतीच्या गतीन विकास रथावर धावायला लागेल.

एक पत्रकार म्हणून आणि बीडचा नागरिक म्हणून गेल्या 25 26 वर्षापासून राजकीय सामाजिक क्षेत्रातील चांगल्या वाईट लोकांशी जवळचे संबंध आले राजकीय पुढारी म्हटलं तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जय दत्त क्षीरसागर विमलताई मुंदडा यांच्यापासून ते विद्यमान बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यापर्यंत अनेकांच्या कामाचा अनुभव घेतला आहे पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी गेल्या दोन दिवसात बीडमध्ये मुक्कामी राहून कामाचा जो काही सपाटा लावला तो पाहिल्यानंतर खरोखरच पहाटे साडेपाच वाजता एखादा मंत्री कामासाठी रस्त्यावर येऊ शकतो हे पाहून आश्चर्य वाटले.

आज पर्यंत मंत्री संत्री आमदार खासदार हे लोक म्हणजे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आल्याप्रमाणेच वागणारे पाहण्यात आले आहेत अनेक मंत्र्यांची सकाळ ही नऊ दहा वाजता होते अनेक राजकीय पक्षाचे पुढारी दुपारी बारा वाजेपर्यंत घराच्या बाहेरच पडलेले दिसत नाहीत मात्र अजित पवार यांच्यासारखा माणूस बीड असो की पुणे पहाटे सहाच्या आत घराबाहेर असतात रस्त्यावर असतात कामाची पाहणी करताना दिसतात हा खरचंच वाखाण्याजोगा गुण आहे.
उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार दोन दिवस बीडमध्ये मुक्कामी होते बुधवारी दादा पाच वाजता बीडमध्ये आल्यानंतर त्यांनी रात्री दहा वाजेपर्यंत अनेक व्यापारी संघटना वकील इंजिनियर सामाजिक संघटना यांच्यासोबतच वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसोबत वेगवेगळ्या विभागांचा आढावा घेतला. साधारणपणे रात्री दहा वाजेपर्यंत प्रशासकीय बैठका उरकल्यानंतर दादा शासकीय विश्रामगृहावर गेले त्यानंतरही त्यांचे तास दोन तास काम सुरूच असावे म्हणजेच रात्री बारा वाजता आरामासाठी गेलेला हा माणूस पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटांनी चंपावती क्रीडा मंडळावर पाहणी करण्यासाठी हजर होतो याचा अर्थ या माणसाच्या डोक्यात कामाच्या प्रती किती वाजता आहे हे लक्षात येते.
पहाटे साडेपाच पासून सुरु झालेला अजित पवारांचा दिवस रात्री नऊ वाजेपर्यंत बीड जिल्ह्याच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त होता चंपावती क्रीडा मंडळ जिल्हा स्टेडियम कंकालेश्वर मंदिर परळी औष्णिक वीज केंद्र बाबत बैठक स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाबाबत बैठक जिल्ह्यातील आरोग्य पाणी महामार्ग शाळा ऊसतोड कामगार यांच्या प्रश्नांबाबत दिवसभर नॉन स्टॉप कामात असणाऱ्या या माणसाने अनेक विकास कामांना भेटी देऊन क्वालिटी कॉम्प्रमाईज कराल तर गाठ माझ्याशी आहे हे सांगायलाही कमी केले नाही.
बीड जिल्ह्याने आजवर अनेक पालकमंत्री पाहिले आणि अनुभवले आहेत मात्र पहाटे सहाच्या आत रस्त्यावर उतरून कामाला लागणारा मंत्री पहिल्यांदाच पाहिलाय विशेष बाब म्हणजे अजित पवार ज्या ज्या वेळी बीडमध्ये बैठका घेण्यासाठी आले त्यावेळी सार्वजनिक बांधकाम महावितरण विभागीय आयुक्त पोलीस महानिरीक्षक अधीक्षक अभियंता मुख्य अभियंता असे वरिष्ठ अधिकारी देखील बीडमध्ये हजर झाल्याचे दिसून आले.
अजित पवारांनी दोन दिवसात बीड जिल्हा वाशी यांच्या अपेक्षा खूप उंचावर नेऊन ठेवले आहेत येत्या पाच वर्षाच्या काळात अजित पवार यांच्याकडेच बीडचे पालकमंत्री पद असावं ( त्यांच्या स्वभावानुसार त्यांना हे ओझं नकोही असेल ) अशी बीड वासियांची अपेक्षा आहे कारण बारामतीच्या सोबत स्पर्धा करायचे असेल तर वाढपी आपला हक्काचा असायला हवा.












Leave a Reply