टक्केवारी द्या अन लोन घ्या, प्रशासन चौकशी करणारं का?
बीड – बीड शहरातील एका प्रतीत यश महाविद्यालयामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महाविद्यालयातील कर्मचारी सहकारी पतसंस्थेमध्ये एखाद्या प्राध्यापक अथवा कर्मचाऱ्याला कर्ज हवे असेल तर त्या पतसंस्थेच्या सचिवाला टक्केवारी द्यावी लागते किंवा जास्तीचे कर्ज काढून लाख-दोन लाख रुपये सचिवाच्या हातात दिल्याशिवाय कर्ज प्रकरण मंजूर होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठवाड्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये प्राथमिक शाळेपासून ते पदव्युत्तर महाविद्यालयापर्यंत पसारा असलेल्या एका महाविद्यालयात कर्मचारी पतसंस्थेच्या माध्यमातून अक्षरशा पिळवणूक सुरू आहे. बीड शहरात असलेल्या या महाविद्यालयाच्या कर्मचारी पतसंस्थेचे सभासद हे जवळपास 150 ते 200 कर्मचारी आणि प्राध्यापक आहेत.
कर्मचारी पतसंस्था म्हणजे कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणीमध्ये खंबीरपणे पाठीशी उभा राहणारी संस्था असते या संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव हे कर्मचाऱ्यांमधूनच निवडले जातात त्यामुळे अवघ्या तासाभरात कुठलेही कर्ज प्रकरण मंजूर होणार याची खात्री असते.
मात्र बीडच्या महाविद्यालयातील कर्मचारी पतसंस्थेमध्ये सचिव महाशय भलतेच डांबरट असल्याची चर्चा आहे. एखाद्या प्राध्यापक अथवा कर्मचाऱ्याला कर्ज हवे असल्यास त्याला या सचिव महोदयांना खुश करावे लागते. कर्मचाऱ्यांनी पाच किंवा दहा लाख रुपये कर्ज मागितले तर त्याच्या नावावर जास्तीचे लाख दोन लाख रुपये कर्ज मंजूर केले जाते.
जास्तीचे लॉक दोन लाख रुपये हे सचिव महाशय उचलतात या महाशयांना देखील चांगलाच नाद असल्याने त्यांच्या हातात पैसा टिकत नाही अशी देखील चर्चा आहे. या महाशयांवर यापूर्वी देखील सहकारी महिला अथवा विद्यार्थिनी यांच्याशी असभ्य वर्तन केल्याचा ठपका ठेवला गेलेला आहे.
मराठवाड्यात नावाजलेल्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या या महाविद्यालयात कर्मचारी पतसंस्थेच्या माध्यमातून सचिव महाशयांनी जो काही धंदा मांडला आहे त्याला संचालक अथवा प्राचार्य काही पाय बंद घालणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.












Leave a Reply