सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वर्षा
🚩 दक्षिणायन 🌕 श्रावण शुक्ल अष्टमी
🌸 नक्षत्र… विशाखा
🌸 वार… शनिवार
🌼 दिनांक….. ०२ आँगस्ट २०२५
🌚 राहुकाल… सकाळी ०९/३० ते १०/३०
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०५/४६ मि.
🌘 सुर्यास्त ०७/१० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशिभविष्य ‼️दिनांक ०२ आँगस्ट २०२५
मेष:- अनुकूल दिवस आहे. शत्रू पराभूत होतील. इतरांना मदत कराल. तुमचा स्वभाव करारी आहे. आज तुम्ही कठोर निर्णय घ्याल. आवडती व्यक्ती भेटेल. कोर्ट कामात यश मिळेल. नात्यातून लाभ होतील.
वृषभ:- षष्ठ स्थानी चंद्र आहे. काही सुखद घटना घडतील. आर्थिक लाभ उत्तम होतील. व्यापार वाढेल. भेटवस्तू मिळतील. मानासारखी कामे पूर्ण होतील. मन उत्तेजित राहील.
मिथुन:- उत्तम दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. आर्थिक तरतूद होईल. लॉटरी मधून लाभ मिळतील. प्रेमात यश लाभेल. संतती बाबत खुश खबर मिळेल.
कर्क:- उद्योग/व्यवसायात भरघोस वाढ होईल. प्रगतीची नवी दालने खुली होतील. जमीन व्यवहारात लाभ होतील. वाहन सुख लाभेल. छोटी सहल घडेल. मात्र मोठे निर्णय आज नकोत. बुद्धी भ्रम होऊ शकतो. वाहन व्यवहारात तोटा संभवतो.
सिंह:- तृतीय स्थानी चंद्र आहे. भरपूर आर्थिक लाभ होतील. अधिकार वाढतील. सामाजिक वजन वाढेल. मात्र शत्रूला कमजोर समजू नका. एखादा सामान्य व्यक्ती देखील तुम्हाला अडचणीत आणू शकतो.
कन्या:- चांगले अनुभव येतील. तुमच्या राशीतील मंगळ तुम्हाला आक्रमक आणि तडफदार बनवेल. कामात प्रगती होईल. कामाचा वेग वाढेल. पैशांची तजवीज होईल. जोडीदाराची नाराजी दूर करावी लागेल.
तुळ:- अनुकूल ग्रहमान आहे. तुमच्याच राशीत चंद्र आहे. सुखद अनुभव येतील. मन आनंदी राहील. सहावा शनी आणि आठवा हर्षल यांची नाराजी जाणवेल. कोणत्याही गुंत्यात गुंतू नका. विश्वासु व्यक्तीचाच हात धरा. दशम रवी तुमची नोकरीतील प्रतिष्ठा सांभाळेल.
वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. कामाचे नियोजन बदलले जाईल. जमीन व्यवहार पुढे ढकलले जातील. सप्तम स्थानी हर्षल आहे. शत्रूंला कमी लेखू नका. कनिष्ठ सहकारी अडचणीत आणू शकतात. भागीदारी व्यवसायात सावध भूमिका घ्या.
धनु:- अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. स्वप्ने साकार होतील. नवीन संधी चालून येतील. सप्तम शुक्र तुमच्या आयुष्यात नवीन व्यक्तींना प्रवेश देईन. प्रिय व्यक्तीची भेट होईल. अष्टम रवी मात्र तुम्हाला संभाळवून पावले टाकण्यास सूचित करत आहे.
मकर:- दशम स्थानी चंद्र आहे. व्यावसायिक वाढ होईल. कामाचा ताण वाढेल. मात्र नफा देखील वाढणार आहे. आरोग्य सुधारेल. शब्द जपून वापरा. औषधांची विरोधी प्रतिक्रिया येऊ शकते. योग्य सल्ला घ्या. घशाची काळजी घ्या.
कुंभ:- प्रसन्न ग्रहमान आहे. आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील. व्यावसायिक कामातून यश मिळेल. तुमच्या राशीत राहू आहे. आरोग्य विषयक प्रश्न निर्माण होऊ शकतात. कोणताही मोठा निर्णय घेताना योग्य सल्ला घ्या. दररोज राहूचा जप करावा. काळ्या कुत्र्याला अन्नदान करावे.
मीन:- संमिश्र दिवस आहे. अजूनही फर्सवही अनुकूलता नाही. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नवीन ओळखी होतील. दानधर्म करण्यास चांगला दिवस आहे. जुने गूढ उकलण्यास आज मदत मिळेल. काही प्रशांची उत्तरे मिळतील.












Leave a Reply