News & View

ताज्या घडामोडी

1200px BAMU gate

चंद्रकांत दादा, क्षीरसागर, मुंडे, दानवे यांच्या कॉलेजवर कारवाई!

छत्रपती संभाजीनगर -राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे, रावसाहेब दानवे यांच्यासह मराठवाड्यातील अनेक शिक्षण सम्राटाना मराठवाडा विद्यापीठाने जोरदार धक्का दिला आहे. चार जिल्ह्यातील तब्बल 113 महाविद्यालय मधील प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठाणे दिले आहेत. बोगस प्राध्यापक भरती, वेतन न देणे आणि अन्य असुविधा च्या कारणामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, रावसाहेब दानवे, सुप्रिया सुळे, सतीश चव्हाण, प्रकाश साळुंके, राजेश टोपे, जयदत्त क्षीरसागर, बसवराज पाटील आणि मधुकर चव्हाण यांच्या संबंधित शिक्षण संस्थांचा समावेश आहे.
विद्यापीठाच्या तीन सदस्यीय समितीने केलेल्या तपासणीत प्राध्यापकांच्या बोगस नियुक्त्या, वेतन न देणे आणि बायोमेट्रिक हजेरीसह अन्य सुविधांचा अभाव आढळून आला. हा निर्णय 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी लागू आहे.


विद्यापीठाच्या विद्यापरिषद आणि व्यवस्थापन परिषदेने राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषद (NAAC) मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश थांबवण्याचा निर्णय घेतला होता.
NAAC मूल्यांकनासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाल्यानंतरही अनेक महाविद्यालयांनी आवश्यक सुविधा आणि प्राध्यापक नियुक्त्यांचे निकष पूर्ण केले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने कठोर पाऊल उचलत 113 महाविद्यालयांचे प्रवेश बंद केले.


जिल्हानिहाय प्रवेश थांबवलेली महाविद्यालये
छत्रपती संभाजीनगर: 79
जालना: 40
बीड: 44
धाराशिव: 24
प्रवेश थांबवलेल्या प्रमुख शिक्षण संस्था
हरिभाऊ बागडे: संत सावतामाळी महाविद्यालय, फुलंब्री
चंद्रकांत पाटील: आर.पी. महाविद्यालय, धाराशिव
पंकजा मुंडे, धनंजय मुंडे: वैजनाथ महाविद्यालय, परळी
रावसाहेब दानवे: मोरेश्वर महाविद्यालय, भोकरदन
सुप्रिया सुळे: मौलाना आजाद शिक्षण संस्था, कासेल
सतीश चव्हाण, प्रकाश साळुंके: मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची 5 महाविद्यालये
राजेश टोपे: मत्स्योदरी शिक्षण संस्था, जालना
जयदत्त क्षीरसागर: आदर्श शिक्षण संस्था, बीड
बसवराज पाटील: माधवराव पाटील महाविद्यालय, मुरुम
राणा जगजीतसिंह: तेरणा महाविद्यालय, धाराशिव
मधुकर चव्हाण: नळदुर्ग महाविद्यालय, धाराशिव
, माजी खासदार उत्तमसिंह पवार, माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यासह रमेश आडसकर, प्रभाकर पालोदकर, उद्योजक मानसिंग पवार, रंगनाथ काळे, डॉ. योगेश क्षीरसागर, रमेश पोकळे, सुभाष सारडा, राजाभाऊ देशमुख, कपिल आकात, सुधीर पाटील, प्रा. सुनील मगरे, सिद्धांत गाडे, तुषार शिसोदे यांच्यासह इतर राजकीय पक्षांशी संबंधित पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.


महाविद्यालयांची यादी पुढीलप्रमाणे –
स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, अंबाजोगाई, यशवंतराव चव्हाण कॉलेज अंबाजोगाई, खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई, आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, अंबाजोगाई, योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई, भगवान महाविद्यालय, आष्टी, गांधी कॉलेज कडा, बी डी हंबर्डे कॉलेज, कडा, आनंदराव धोंडे कॉलेज कडा, फर्मास्युटीकाल कॉलेज, आष्टी, छत्रपती राजश्री शाहू कॉलेज आष्टी, एम आय आय टी कॉलेज बीड, कोजेज ऑफ फिझीकलं एज्युकेशन बीड, स्वा. सावरकर कॉलेज बीड, गुरुकुल कॉलेज ऑफ कॉम्पुटर सायन्स, बीड, बलभीम कॉलेज बीड, के. एस. के कॉलेज, बीड, संभाजी इहे कॉलेज बीड, तुलसी कॉलेज, बीड, वसंतराव काळे कॉलेज बीड, आदित्य सायन्स कॉलेज, बीड, आर्टस् सायन्स कॉलेज धारूर, आर बी अट्टल. कॉलेज गेवराई, संत भगवान बाबा एम एड कॉलेज केज, बाबुराव आडसकर कॉलेज केज, संत तांबवेश्वर कॉलेज केज, सुंदरराव सोळंके कॉलेज, माजलगाव, सिद्धेश्वर महाविद्यालय, माजलगाव, आर्टस्, सायन्स कॉलेज परळी, वैद्यनाथ कॉलेज, परळी, श्री पंडितगुरू पार्डीकर कॉलेज, सिरसाळा, आर्टस् सायन्स कॉलेज चौसाळा, वसंतदादा पाटील कॉलेज पाटोदा, कालिकादेवी कॉलेज शिरूर कासार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *