News & View

ताज्या घडामोडी

IMG 20250723 WA00371

भाजपच्या रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद!सातशे जणांचा सहभाग!

बीड:  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पशुसंवर्धन तथा हवामान बदल मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने व जिल्ह्यातील जवळपास सर्व मंडळात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या  रक्तदान शिबिरस जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून जिल्हाभरात ७०० रक्तदात्यांनी रक्दान केले बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात लोकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले आहे .


राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांचा दि.22 जुलै रोजी वाढदिवस आहे तो संपूर्ण राज्यात उत्साहात साजरा केला जात असून  लोकनेत्या मा. ना. पंकजाताई मुंडे यांच्या दिनांक 26 जुलै रोजी वाढदिवस आहे या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस राज्यभर उत्साहात साजरा केला जात असून बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीने देखील विविध कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात व उत्साहात वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले आहे.


बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीचा जिल्हा कार्यालयात संपन्न झालेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सकाळी ठीक दहा वाजता भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख जिल्हा सरचिटणीस ऍडव्होकेट शिवाजीराव तांबे प्रा.देविदास नागरगोजे नवनाथ शिराळे अशोक सेठ लोढा, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या या दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या
या उपक्रमामध्ये जिल्हा भरातील 16 मंडलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान केले आहे.
जिल्ह्यातील सर्व ठिकाणी झालेल्या या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र  देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले .

जिल्हा कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस
ॲड. सर्जेराव तांदळे, , प्रा. देविदास नागरगोजे, नवनाथ शिराळे ,बीड मंडळ अध्यक्ष अशोक लोढा बालाघाट मंडळ अध्यक्ष अशोक रसाळ सलिम जहागीर, विक्रांत हजारी,चंद्रकांत फड, श्रीमती भाग्यश्री ढाकणे,शांतीनाथ डोरले, अजय सवाई, दादासाहेब नन्नवरे , संध्याताई राजपूत, अशोक घोडके,मीराताई गांधले, संगीता धसे, प्रीत कूकडेजा, अनिता जाधव, अमोल वडतिले, राजू शहाणे, केशव बडे प्रमोद रामदासी,  हरीश खाडे, विष्णू महाराज, नरेश पवार, कपिल सौदा विलास बामणे अमोल वरती यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. रक्तदान शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या बीड ब्लड बँकचे जनसंपर्क अधिकारी श्री. रवी किरण गिरी यांच्यासह संपूर्ण स्टाफने केलेल्या सहकार्य बद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचे स्वागत करून सर्वांचे आभार व्यक्त केले . रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी बीड शहर मंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *