बीड- येथील नगर परिषदचे नाट्यगृह बांधकामासाठी बीड च्या द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकने रु.एक कोटी फक्त कर्ज सन २००६ मध्ये दिले होते. खाते एन पी ए होऊन देखील कर्ज बाकी न भरल्यामुळे बँकेने कर्जासाठी तारण दिलेल्या नाट्यगृह मालमत्तेचा सांकेतिक ताबा सरफेसी-२००२ या कायद्यातर्गत दि.१६/०६/२०२३ रोजी घेतला होता. सदर कार्यवाहीमुळे मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे मॅडम यांनी याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन बँकेची संपूर्ण कर्ज बाकी रु.१,०४,३३,३९६/-(अक्षरी रु. एक कोटी चार लाख तेहतीस हजार तीनशे शहान्नव फक्त) ताबडतोब बँकेकडे भरणा केलेली आहे. पूर्वी भरलेल्या रकमेसह जवळपास एकूण रु.३,१३,०००००/- रुपयाचा भरणा नगरपरिषद यांनी केला आहे त्यामुळे बँकेने केलेली कार्यवाही मागे घेतल्याची माहिती प्राधिकृत अधिकारी प्रशांत बोंदार्डे यांनी दिली आहे.
बीड येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लि.बीड या बँकेने सामाजिक बांधीलीकी म्हणून बीड नगरपरिषद कडून उभारण्यात येणा-या नाट्यगृहाचे बांधकामासाठी सन २००६ मध्ये रुपये एक कोटी फक्त कर्ज दिलेले होते. बीड शहरात अत्याधुनिक व सर्व सुविधायुक्त भव्य असे नाट्यगृहाचे बांधकाम करण्याकरीता बीड नगर परिषदेने शासनाचे योजनेअंतर्गत शासनाचा ७५% निधी व २५% न.प.चा हिस्सा या तरतुदीनुसार मंजुरी देण्यात आलेली होती. शासनाची रक्कम प्राप्त झाली परंतु नगर परिषदेच्या २५% हिश्याची रक्कम कमी पडत असल्यामुळे नगर परिषद बीडच्या मागणी प्रमाणे द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेने नाट्यगृहाच्या मालमत्तेचे नोंदणीकृत गहाणखत करून घेऊन कर्ज दिले होते. सदरील कर्ज परतफेडीची मुदत सहा वर्ष देण्यात आली होती त्यामध्ये एक वर्ष फक्त व्याज भरण्याचे होते( माँरेटरीअम परीअड) व पुढील पाच वर्षामध्ये व्याजासह हप्त्याने परतफेड करण्याचा करारनामा नगर परिषद यांनी करून दिलेला होता.
प्रारंभी काही वर्ष नगरपरिषदेने व्याज व हाप्त्याची रक्कम भरणा केली परंतु पुढे कर्जाची मुदत संपूनही कर्ज भरणा केला नाही. तरीही बँकेने सामाजिक दृष्टीकोनातून विचार करून कर्ज बाकी भरण्यास वेळ दिला. परंतु मध्यंतरी बँकेवर भारतीय रिझर्व बँकेने निर्बध लावल्यामुळे कर्ज खाते बेबाक करण्यासाठी बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी नगरपरिषदेचा पाठपुरावा केला परंतु कर्जाची रक्कम न भरल्यामुळे नाविलाजास्तव बँकेला कायदेशीर कार्यवाही करावी लागली.
बँकेने केलेल्या कार्यवाहीमुळे श्रीमती नीता अंधारे मँडम यांनी ताबडतोब दखल घेऊन सकारात्मक भूमिकेतून बँकेचे संपूर्ण कर्ज बाकी रु.१,०४,३३,३९६/-(अक्षरी रु. एक कोटी चार लाख तेहतीस हजार तीनशे शहान्नव फक्त) दुस-याच दिवशी भरून कर्ज खाते बेबाक केलेले आहे. त्यामुळे बँकेने सुरु केलेली कार्यवाही मागे घेतलेली असल्याचे बँकेचे प्राधिकृत अधिकारी श्री.प्रशांत बोंदार्डे यांनी सांगून बीड नगर परिषदचे व मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांचे आभार मानले आहे. मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे मँडम यांनी दाखवलेली समयसूचकता व ताबडतोब पुढाकार घेऊन कर्जखाते बेबाक केल्यामुळे बँकेची पुढील कायदेशीर कार्यवाही टळली असून बँकेने केलेली सरफेसी कायद्या अंतर्गत चालू केलेली कार्यवाही मागे घेत असल्याची घोषित केले आहे.
Leave a Reply