बीड- बीड जिल्ह्यातील तब्बल 66 हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्यापही सरळ पोर्टलवर जोडले गेलेले नाहीत.पाच लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट झाले आहेत मात्र ज्यांचे आधार कार्ड अपडेट झाले नाहीत त्या शाळांना दोन दिवसात अपडेट बाबत सूचित करावे अन्यथा त्या शाळांचे यु डायस नंबर रद्द करण्यात येतील असा इशारा शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिला आहे.
बीडचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी एक बैठक घेऊन आधार कार्ड अपडेट बाबत सविस्तर माहिती घेतली.बीड जिल्ह्यात 3674 शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याची कारवाई मागील तीन महिन्यापासून सुरू आहे.मात्र अनेक इंग्रजी,मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आधार कार्ड संलग्न करण्यास टाळाटाळ केली गेली आहे.या सर्व विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली.
बीड जिल्ह्यात 3674 शाळांमध्ये मागील वर्षी पाच लाख 94 हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट होते.मात्र यावर्षी तब्बल 66 हजार विद्यार्थी अद्यापही आधार कार्ड विना आहेत.यामध्ये वडवणी मधील 130 शाळांमधील808 विद्यार्थी,आष्टी मधील 380 शाळांमधील 2447 विद्यार्थी, शिरूर- 247 शाळा,1543विद्यार्थी, बीड-508 शाळा,4183 विद्यार्थी, गेवराई-443 शाळा-5461 विद्यार्थी, पतीदा-245 शाळा,2044 विद्यार्थी, धारूर-178 शाळा,3380 विद्यार्थी,केज-363 शाळा,7770 विद्यार्थी, माजलगाव-310 शाळा,6911 विद्यार्थी, आरसी बीड-208 शाळा,11627 विद्यार्थी, अंबाजोगाई-336 शाळा,10181 विद्यार्थी, परळी-318,10623 विद्यार्थी हे अद्यापही आधार कार्ड अपडेट न झालेले आहेत.
बीड जिल्ह्यात बहुतांश इंग्रजी शाळांनी आधार कार्ड अपडेट केलेलं नाही.अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवून दाखवण्यात आली आहे. अनेक शाळांमध्ये तेच तेच विद्यार्थी दाखवून आर टी ई चा निधी लाटण्याचा प्रकार देखील या शाळांनी केलेला आहे.त्यामुळे आता जर या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट झाले नाहीत तर मोठा घोटाळा उघडकीस येईल हे नक्की.
बीड जिल्ह्यातील ज्या शाळांनी आधार कार्ड अपडेट केलेले नाही त्या शाळांना संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी नोटीस पाठवून दोन दिवसात सरल पोर्टलवर अपडेट चे काम करून घ्यावे अन्यथा त्या शाळांचे यु डायस नंबर रद्द करण्यात येतील असा ईशारा देण्यात आला आहे.
Leave a Reply