बीड – बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुल प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राला काळीमाप असणाऱ्या या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती.
उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये बारावीचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने तिचा पवार आणि खातोकर यांच्याकडून लैंगिक छळ झाल्याची तक्रार केली होती त्यानंतर या दोघांना पोलिसांनी मांजरसुंबा परिसरातून अटक केल्याचे दाखवून न्यायालयात हजर केले होते दोन वेळा पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती.
गुरुवारी याबाबतीत न्यायालयासमोर आरोपीचे वकील एडवोकेट बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवाद करत जामिनाची मागणी केली. यावर न्यायालयाने पवार आणि खाटोकर या दोघांना जामीन मंजूर केला आहे.
जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान आरोपींच्या वतीने प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी जोरदार युक्तिवाद करत आरोपींना जामीन मिळावा अशी मागणी केली. त्यांना अॅड. गणेश कोल्हे, अॅड. संज्योत महाजन, अॅड. योगेश सुरवसे, अॅड.अभिजीत चौरे, अॅड.धनराज जाधव व अॅड.सोनवणे यांनी सहकार्य केले.












Leave a Reply