बीड -श्री क्षेत्र नारायणगड चे ट्रस्टी बळीराम बबन गवते आणि बी बी जाधव या दोघांनी गडाची विनाकारण बदनामी केली. पंचवीस कोटी रुपयांची कामे त्यांना करून गुत्तेदारी करायची होती. गडाच्या अनेक जागा त्यांनी विकून आर्थिक गैरव्यावहार केल्याचा खळबळजनक आरोप गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी केला.
बीड तालुक्यातील नारायणगडाचा वाद गेल्या काही दिवसापासून सुरु आहार. गडाचे वारस म्हणून शिवाजी महाराज यांनी भाचे संभाजी महाराज यांची नियुक्ती केल्यानंतर वादाला सुरवात झाली.
गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन गडावर दबाव आणण्याचा प्रयत्न जाधव आणि गवते यांनी केला असं म्हटलं. स्व विनायक मेटे यांनी गडासाठी राज्य सरकारकडून पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. हे कामं गवते आणि जाधव यांना करायचे होते. मात्र ते न मिळाल्याने त्यांनी गडाची बदनामी केली.
2012 मध्ये बळीराम गवते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी निधी गोळा करण्यासाठी सुरवात केली, मात्र त्या निधीचा वापर स्वतःसाठी केला. असा आरोप महाराजांनी केला.
गडावर दबाव आणणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी यापुढे शंभर मुलांची टीम तयार असेल असा ईशारा सुद्धा त्यांनी दिला.












Leave a Reply