News & View

ताज्या घडामोडी

IMG 20250712 WA0062

बारावीनंतर काय? तज्ञांचे मार्गदर्शन!

बीड -नुकताच एमएचटी सीइटी चा निकाल लागला असून राज्यातील शासकीय, ऑटोनोमस, निमशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात यावर्षीची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे.या प्रवेश प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणजे नोंदणी व कागदपत्र पडताळणी. हा टप्पा २८ जून ते ११ जुलै पर्यंत होता परंतु याची तारीख वाढवून आता 14 जुलै करण्यात आली आहे.यानंतर लवकरच या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्राधान्यक्रम भरणे हा सुरू होईल ज्याला कॅप राऊंड असे म्हटले जाते. यावर्षी या कॅपच्या नियमांमध्ये बरेच नवीन बदल करण्यात आलेले आहेत. हे नवीन नियम काय आहेत आणि एकूणच ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी उद्या रविवार दिनांक 13 जुलै रोजी शहरातील जोशीज मॅथस क्लासेस च्या वतीने एक मार्गदर्शन सेमिनार आयोजित केला आहे. हा सेमिनार सकाळी ठीक अकरा वाजता जोशीज मॅथस क्लासेस , उमाकिरण शैक्षणिक संकुल, आदर्श नगर,बीड येथे होणार असून यामध्ये या क्षेत्रातील वीस वर्षांहून अधिक काळचा अनुभव असणारे श्री सुनील जोशी सर हे मार्गदर्शन करणार आहेत.


यामध्ये कॅपच्या नियमांसोबतच विद्यार्थी व पालकांना जे काही महत्त्वाचे प्रश्न पडतात जसे की कॅप चे राऊंड किती व कसे असतील? प्रत्येक राऊंड मध्ये फ्रिझ, फ्लोट किंवा स्लाईड चा निर्णय कसा घ्यावा? इंजिनियर व्हायचं पण ब्रँच कशी निवडायची, कॉलेज कसं निवडायचं , काही विद्यार्थी चांगली ब्रँच मिळवतात परंतु महाविद्यालय फारसे नावाजलेले नसते, तर काहींना उत्तम महाविद्यालय मिळते परंतु हवी ती ब्रँच मिळत नाही. अशा वेळी योग्य निर्णय कसा घ्यावा,आपली रँक किंवा पर्सेंटाइल लक्षात घेऊन वास्तववादी व योग्य पर्याय कसे निवडावे, प्रेफरन्स फॉर्म भरताना काय काळजी घ्यावी,मागील वर्षांचे कटऑफ कसे पहावेत, याबद्दल ही सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
आपली आवड , करिअरचे ध्येय व भविष्यातील संधी नेमक्या कुठं असतील? कॉम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल, सिव्हिल की नवीन क्षेत्रं, जसे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशिन लर्निंग, ब्लॉक चेन, इंटरनेट ऑफ थिंग्स, सायबर सिक्युरिटी की रोबोटिक्स? आपल्याला पुढे प्लेसमेंट हवे आहे की उच्च शिक्षण घ्यायचं आहे? स्पर्धा परीक्षा, संशोधन, किंवा स्टार्टअपचा विचार आपण करतोय का? ब्रँच महत्त्वाची की महाविद्यालय? ब्रँच निवडताना
अभ्यासक्रम, भविष्यातील संधी, इंडस्ट्रीतील मागणी, उच्च शिक्षणाच्या संधी, नोकरी, व्यवसाय किंवा स्टार्टअपच्या संधी, किंवा महाविद्यालय निवडताना मानांकन व रँकिंग (नॅक, एनबीए, एनआयआरएफ रँकिंग), ऑटोनॉमस की नॉन ऑटोनॉमस, संलग्न महाविद्यालय की खासगी विद्यापीठ,
या सगळ्या गोष्टींचे अभ्यासपूर्वक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी सर्व विद्यार्थी व पालकांनी या शिबिरास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जोशीज मॅथस क्लासेस च्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *