बीड -नागपूर येथील बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे धाबे दनानलेल्या बीडच्या काही प्राथमिक आणि माध्यमिक गुरुजींनी आठ दहा वर्षाचे एरियर्स (मागील फरकाची रक्कम )संस्थाचालकांच्या पायावर घातले आहेत. आपलं पाप उघड पडू नये म्हणून हे संस्थाचालक मुंबई पासून छत्रपती संभाजीनगर पर्यंत चकरा मारत आहेत. विशेष म्हणजे लाखो, कोटिमध्ये घेतलेली ही दक्षिणा संस्थाचालकांनी स्वतःचे घर भरण्यासाठी वापरली आहे. ज्या बँकामधून हा व्यवहार झाला त्या बँका देखील चौकशी अंती गोत्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बीड शहरात ऐक ऐक युनिट असलेल्या तसेच मराठवाड्यात शिक्षण प्रसारक या नावाने तीन चार संस्था मध्ये अनेक शिक्षक बोगस भरती करण्यात आले. काळ्या पाण्याची शिक्षा भोगून स्वातंत्र्य लढ्यात प्राण पणाला लावणाऱ्या महापुरुषांच्या नावाला बट्टा लावण्याचे कामं या संस्थाचालकांनी केले आहे.
बीड ज्या शहराचे नाव पूर्वी चंपावती होते त्या नावाचा आधार घेऊन शिक्षणाच्या क्षेत्रात संस्कार रुजवणाऱ्या संस्थाचालकांनी आपल्याकडे 2012 पासून किंवा त्या अगोदर पासून नोकरीस असल्याचे दाखवत अनेकांना नोकरीत कायम करण्याचा प्रयत्न केला.
यामध्ये त्यांना नाना प्रकारे मदत करण्यासाठी ज्याने प्रयत्न केले त्याने या शिक्षकांकडून लाखो रुपये वसूल केले. अनेक शिक्षकांचे किमान पन्नास पन्नास लाख जमा झाले होते. ते या नाना कला अंगी असलेल्या संस्थाचालकाने काही डॉक्टर, काही वकील, काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून गडप केले.
आपण नोकरी मिळावी म्हणून पाच पंचवीस लाख मोजले, त्यानंतर जुने थकबाकीचे पैसे सुद्धा संस्थाचालकांनी घेतल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सुर आहे.
कोणत्याही शिक्षकाचे पगाराचे पैसे हे राष्ट्रीयकृत बँकेत जमा होतात, त्यानंतर या बोगस शिक्षकांचे खाते जिल्ह्यातील काही आपल्याच जवळच्या लोकांच्या बँकात काढून या संस्थाचालकांनी सात, आठ आणि नऊ कोटी आपल्या घशात घातले आहेत. लवकरच या बँकाची नावे आणि एकरकमी लाखो रुपये एकाच दिवशी संस्था चालकांच्या नावावर ट्रान्सफर करणाऱ्या शिक्षकांना आलेल्या नोटीस देखील न्यूज अँड व्यूज सर्वांसमोर मांडणार आहे.
हे सगळे उलटे सुलटे धंदे करण्यासाठी या नाना संस्थाचालकांना वेतन आणि भविष्य निर्वाह पथक अर्थात पे युनिट प्राथमिक आणि माध्यमिक मधील अधीक्षक असोत कि शिपाई यांनी तसेच भगवान फुलारी, नागनाथ शिंदे यांनी अर्थपूर्ण मदत केली आहे. त्यांची देखील मंत्राल्यापासून चौकशी सुरु झाली आहे. त्यामुळे लक्ष्मीदर्शन करून बोगस कामं करणारे हे सगळे बिन भाड्याच्या खोलीत जाणार हे नक्की.












Leave a Reply