बीड- शहरातील कालिका नगर,चराठा रोड भागात दोन गटात झालेल्या वादातून गोळीबाराची घटना घडली आहे.यामध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनास्थळी पोलीस अधीक्षक यांच्यासह मोठा फौजफाटा पोहचला आहे.
कालिका नगर कमानी जवळ शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली.यामध्ये गायकवाड नामक व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वाद नेमका काय होता याबाबत पोलीस माहीत घेत आहेत.
Leave a Reply