बीड- गायरान आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याची नोटीस प्रशासनाने दिल्यानंतर भारत अवचार याने विष प्राशन केल्याने खळबळ उडाली आहे. अवचार याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा रिपाई ने दिला आहे.
बीड शहरातील इंदिरानगरसह विविध भागातील रहिवाशांना घरे तोडण्यासाठी नोटीस देण्यात आलेल्या आहेत. अगोदरच गरिबी आणि कर्ज काढून बांधलेले घर तोडण्याच्या देण्यात आलेल्या नोटीसांचा धाक घेऊन इंदिरानगर बीड येथील रहिवाशी भारत विठ्ठल आवचार वय 55 वर्ष धंदा मजुरी यांनी बुधवार (दि.१४) जून रोजी पहाटे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.या प्रकारास जिल्हा प्रशासन जबाबदार असून सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे.
भारत आवचार यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे व तहसीलदार यांनी घर धारकांना सोडलेल्या नोटीसांच्या धाकामुळे घर धारकावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. भारत आवचार यांची प्रकृती चिंताजनक असून घर तोडण्याच्या नोटीसांच्या धाकाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नाचा इंदिरानगर भागातील रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
Leave a Reply