बीड -अवघ्या आठ महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेत रुजू झालेले सिइओ आदित्य जिवने यांची बदली झाली असून त्यांच्या जागी गोंदिया येथून मुरुंगनाथम एम हे येणार आहेत.
राज्य शासनाने काही भाप्रसे अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. ज्यामध्ये बीड जिल्हा परिषदेचे सिइओ आदित्य जिवने यांचा समावेश आहे. जिवने यांना सहायक संचालक महावितरण येथे नियुक्ती देण्यात आली आहे. तर गोंदिया जिल्हा परिषदेचे सिइओ मुरुंगनाथम यांच्यावर बीडची जबाबदारी देण्यात आली आहे.
Leave a Reply