News & View

ताज्या घडामोडी

teacher 2

शिक्षण प्रसाराच्या नावाखाली मांडला धंदा! आर्थिक उलाढालिमुळे संस्थाचालक चौकशीच्या फेऱ्यात!

बीड -भारतीय नावाने शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करायच अन त्याच शिक्षण मंडळात भारतीय आणि विशेषतः संघाशी संबंधित असणाऱ्यांची पिळवणूक करायची असा धंदा काहींनी मांडला आहे. साधा शिक्षक असलेला माणूस अधिकार प्राप्त झाल्यावर कशा पद्धतीने आपल्याच सहकाऱ्यांची पिळवणूक करतो याचे उदाहरण या प्रसारक मंडळात दिसून येते. या सगळ्या बाबत वरिष्ठ पातळीवर तक्रार करूनही फरक पडत नाही कारण हमाम में सब नंगे प्रमाणे अध्यक्षापासून ते शिपायापर्यंत सगळेच या धंद्यात भागीदार आहेत.

शंभर वर्षांपूर्वी जनसेवेच व्रत हाती घेऊन ज्या संघाची स्थापना झाली आज त्याच संघांचे नाव घेत सुरु झालेल्या शिक्षण संस्थांमधून दिवसाढवळ्या दरोडे घालण्याचा उद्योग सुरु झाला आहे.मराठवाड्यात सर्वदूर शिक्षणाचे जाळे पसरवलेल्या या संस्थेत मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि इतर काही लोकांनी सावळागोंधळ मांडला आहे.

आपल्या हातात अधिकार आहेत हे लक्षात आल्यावर काहींनी 2012 ते 2019 या काळात शिक्षक व कर्मचारी भरतीला स्थगिती असताना मोठ्या प्रमाणात आपल्या नातेवाईकांना नोकरी लावली. बरं हे करताना एक पथ्य पाळलं ते म्हणजे जवळचा असो कि लांबचा सगळ्याकडून लक्ष्मीदर्शन झाल्याशिवाय काम केले नाही.

या संस्थेच्या एका माजी अध्यक्षाने संघातील वरिष्ठ लोकांना तसेच विद्यमान अध्यक्षाना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात अनेक खळबळजनक खुलासे करण्यात आले आहेत. पूर्वीचे कार्यवाह, सहकार्यवाह, विद्यमान कार्यवाह यांच्यावर आर्थिक देवाणघेवानीचे आरोप करण्यात आले आहेत. हे पत्र लवकरच आम्ही प्रकाशित करून या संस्थेतील भ्रष्ट लोकांचा बुरखा फाडणार आहोत.

ज्या काळात भरतीला बंदी होती त्या काळात बंदी अगोदर विनाअनुदानित ऑर्डर दिली गेली आणि नंतर शिक्षणाधिकारी यांच्यापासून ते उपसंचालक, संचालक आणि मंत्रालय इथपर्यंत सगळी यंत्रणा मॅनेज केली गेली.

या संस्थेने आपल्या शाळांना महापुरुष आणि देवी देवतांची नावे दिली पण तिथं जो कारभार केला तो या महापुरुषांच्या नावाला बट्टा लावणारा होता. नागपूर येथील बोगस शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आल्यानंतर या संस्थाचालक यांचे धाबे दनानले. त्यांनी लाखो, करोडो रुपये मोजून यंत्रणा मॅनेज करण्याची धडपड केली.

नावात भारतीय शब्द असला तरी आपण आपल्याच लोकांचे गळे कसे पद्धतशीर पणे कापू शकतो याचे उत्तम उदाहरणं म्हणजे ही शिक्षण प्रसारक संस्था होय. या संस्थेतील कुटाण्यामुळे लवकरच पदाधिकारी अन संबंधित अनभिशीक्त अधिकार मिळालेला शिक्षक चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहे हे निश्चित .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *