News & View

ताज्या घडामोडी

240 172269472266ae3c42b28b6 ee6111a4193fb522e1393178cdd10a9e

जिल्हा परिषदेत अडीच कोटींचा घोटाळा!शिक्षकांवर गंडांतर!

बीड – बीड जिल्हा परिषदेचे शिक्षक अडीच कोटी रूपयांच्या घोटाळ्यात अडकणार आहेत. एका अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश हायकोर्टाने दिले आहेत. त्यानुसार पुढच्या आठवड्यात याप्रकरणी सहकार विभाग गुन्हा दाखल करण्याचे संकेत मिळत आहेत.


बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कधी काय होईल याचा नेम नाही. कारण या विभागातील अनेक घोटाळे सातत्याने उघडकीस येत आहेत. मागचा पुढचा थोडाही विचार न करता अधिकारी-कर्मचारी आणि शिक्षक बिनधास्तपणे घोटाळे करत आहेत. त्यामुळेच हा विभाग सातत्याने चर्चेत असतो. आता अडीच कोटींच्या घोटाळ्यात झेडपीचे काही शिक्षक अडकणार आहेत. कारण या अपहाराप्रकरणी न्यायालयाने थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहकार विभागाला दिले आहेत. त्यानुसार सहकार विभागानेही हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार याबाबत पुढच्या आठवड्यात घोटाळेबाजांवर गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.

यापुर्वीही त्या शिक्षकांवर झाला
होता गुन्हा दाखल
विद्यार्थ्यांना शिकविण्यापेक्षा स्वत:चे खिसे भरण्यातच अनेक शिक्षक मग्न असतात, त्यामुळेच झेडपीचे अनेक शिक्षक सातत्याने गोत्यात येत आहेत. कोट्यवधींच्या अपहारप्रकरणी यापुर्वीही शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला होता. आता पुन्हा एखदा याच शिक्षकांवर अडीच कोटींच्या घपल्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश आहेत.

शिक्षकांसह 42 जण गुन्ह्यात
अडकणार
या अडीच कोटींच्या गुन्ह्यात तब्बल 42 जण अडकणार आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेबरोबर खासगी शाळांवरील शिक्षकांचा समावेश आहे. तसेच यात काही अधिकारी आणि कर्मचारीही गुंतणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *