शिक्षण आयुक्तांचे चौकशीचे आदेश!
संस्थाचालकांवर देखील होणार कारवाई!
बीड -बीड जिल्ह्यात 2012 ते 2019 आणि गेल्या तीन वर्षात देखील मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षक आणि कर्मचारी भरती करण्यात आली. न्यूज अँड व्यूज ने याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. काही संस्थाचालकांनी उपसंचालक कार्यालयापासून ते मंत्रालय पर्यंत फिल्डिंग लावली. मात्र बकरे कि माँ कब तक दुवा मांगेगी या पद्धतीने बीडच्या दोन्ही शिक्षणाधिकारी यांनी जो काही नंगानाचं केला आहे तो उघडकीस आला आहे. नागनाथ शिंदे आणि भगवान फुलारी या दोघांनी चारशे ते पाचशे कोटी कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याची तक्रार झाल्यानंतर या प्रकरणी शिक्षण आयुक्त यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत या दोघांची बदली करू नये असे म्हटलं आहे. त्यामुळे आता या दोघांसोबत संस्थाचालक यांचे देखील धाबे दनाणले आहेत.

बीड जिल्ह्यात बहुतांश खाजगी शाळांमध्ये 2012 ते 2019 या काळात नोकर भरती बंदी मोठ्या प्रमाणात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भरती केली. संस्थाचालकांनी या काळात शिक्षक आणि कर्मचारी आपल्या शाळेवर नोकरीस असल्याचे खोटे कागदपत्र तयार करून 2019 ते 2024 या काळात मोठ्या प्रमाणात भरती केली.
बीडचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि माध्यमिक चे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी मागील तारखेतील रजिस्टर वापरून त्या त्या काळातील शिक्षणाधिकारी यांच्या सह्या मॅनेज केल्या. जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असो कि डाव्या विचाराशी संबंधित सगळ्याच संस्थांना शेकडो शिक्षक आणि कर्मचारी भरती करणाऱ्यासाठी अर्थपूर्ण मदत केली.
याबाबत गेल्या वर्षभरापासून न्यूज अँड व्यूज ने सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यानंतर अनेक संस्थाचालक यांनी संभाजीनगर चे उपसंचालक यांच्यापासून ते मंत्रालय पर्यंत यंत्रणा मॅनेज करण्याचा प्रयत्न केला.
मात्र अंधारात केलेलं पाप एक ना एक दिवस उजेडात येतच असं म्हणतात, त्याप्रमाणे बीडमध्ये जो काही शिक्षक भरती घोटाळा झाला आहे त्याची तक्रार शासनाकडे झाली. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्त यांना पत्र पाठवून प्राथमिक चे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि माध्यमिक चे नागनाथ शिंदे यांनी केलेल्या चारशे ते पाचशे कोटीच्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत या दोघांची बीडमधून इतरत्र कोठेही बदली करू नये असे म्हटलं आहे.आता आयुक्त कार्यालयाकडून याबाबत चौकशीसाठी पथक पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर फुलारी आणि शिंदे यांच्यासहित ज्या ज्या संस्थाचालक यांनी काळे धंदे केले आहेत त्यांच्यावर कारवाई होणार हे नक्की झाले आहे.
बीड जिल्ह्यात कोणतीही संस्था असो एक नाना नावाचा व्यक्ती सगळ्यांचं गुत्त घेतो आणि खालपासून ते वरपर्यंत यंत्रणा मॅनेज करून बोगस शिक्षक भरती करतो, य्क माध्यमातून त्याने गेल्या काही वर्षात गडगन्ज संपत्ती जमा केली आहे. त्याच्या वाटेत जो कोणी येईल त्याला साम दाम दंड भेद या माध्यमातून गप्प करण्याचा प्रयत्न हा नाना करतो.
बीड जिल्ह्यात जेवढा काही चारशे पाचशे कोटींचा घोटाळा झाला आहे त्याची चौकशी झाल्यास शिंदे, फुलारी आणि संस्थाचालक यांच्यासोबत नोकरीस लागलेले बोगस शिक्षक आणि कर्मचारी यांना देखील जेलची हवा खावी लागण्याची शक्यता आहे.
Leave a Reply