बीड -बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून संलग्नित असलेल्या 233 महाविद्यालयांना 2025- 26 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला निर्बंध घालण्यात आलेले असून या महाविद्यालयांनी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश देऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत यामुळे संलग्निकरण यादीतील 484 महाविद्यालयापैकी 233 महाविद्यालयात या नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही.
विद्यापीठाकडून महाविद्यालयावर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे . याबाबत माहिती अशी की विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या 21 नोव्हेंबर 2024 रोजी च्या ठरावानुसार कुलुगुरु डॉ. विजय फुलारी यांनी याबाबतचे आदेश दिले होते,
यासंदर्भात शैक्षणिक विभागासह प्र कुलगुरू डॉ. वाल्मीक सरोदे यांनी वारंवार सूचना देऊनही महाविद्यालयाने ट्रिपल ए मूल्यांकनाबाबत उत्सुकता दाखवली नाही.
त्यामुळे अधिष्ठाता मंडळाने अशा 233 महाविद्यालयावर कारवाईचा बडगा उगारला असून या महाविद्यालयावर प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. NAAC मूल्यांकनासाठी पात्र असूनही 233 महाविद्यालयांनी मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
विद्यापीठाच्या अधिपत्याखाली खालील छत्रपती संभाजीनगर, बीड ,जालना आणि धाराशिव या चार जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये विविध कला वाणिज्य विज्ञान संगणक व्यवस्थापन फार्मसी आर्किटेक्चर पत्रकारिता अशा शाखांचे विविध अभ्यासक्रम चालवले जातात
मात्र झिरो इंटेक ही टिप्पणी देऊन प्रवेशाला स्थगिती देण्यात आलेली आहे . कोणकोणत्या महाविद्यालयावर प्रवेशबंदी घालण्यात आली त्या २३३ महाविद्यालयांची यादी खालीलप्रमाणे.
आदित्य कॉलेज ऑफ एम्बीए बीड,सूर्योदय ग्रामीण विकास संस्था राजश्री शाहू अध्यापक महाविद्यालय मोरेवाडी, अंबाजोगाई,आर्टस् -सायन्स अँड कॉमर्स कॉलेज कुसळंब,अपेक्स आयटी कॉलेज माजलगाव,मकसूद सेवाभावी संस्था संचलित डॉ अब्दुल कलाम कॉम्पुटर सायन्स अँड इन्फॉर्मशन टेक्नॉलोजी कॉलेज नेकनूर,कॉलेज ऑफिस एज्युकेशन फॉर ऊमन, बीड,केशवराज सिनियर कॉलेज, दासखेड, ता पाटोदा,महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी, बीड.साईराम आर्टस्, सायन्स कॉलेज, युसूफ वडगाव.भाऊसाहेब कॉलेज ऑफिस एज्युकेशन, केज.स्व रामचंद्र धस कॉलेज ऑफ कॉम्पुटर सायन्स आष्टी.संभाजीराजे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स, शिरूर कासार.श्री बी एस पी एम अध्यापक महाविद्यालय अंबाजोगाई.जनता आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज धानोरा.अध्यापक महाविद्यालय कारी.आदित्य इंजिनिअरिंग कॉलेज, बीड.एस.एस पी एम कॉलेज ऑफ एज्युकेशन आष्टी.जनशिक्षण महाविद्यालय आपेगांव.राजमाता जिजाऊ आर्टस् अँड सायन्स कॉलेज, मादलमोही.कॉलेज ऑफ कॉम्पुटर सायन्स अँड इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी, अंबाजोगाई.आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पिंपळनेर.कॉलेज ऑफ फिजिकलं एज्युकेशन आष्टी.ज्ञानवर्धिनी बी सी ए अँड बी सी एस कॉलेज.जवाहरलाल नेहरू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज परळी.गुरुकुल कॉलेज ऑफ कॉम्पुटर सायन्स अँड आयटी, बीड.एन एस एस आर आर्टस्, सायन्स कॉलेज, तेलगाव.डॉ विश्वनाथराव कराड कॉलेज ऑफ एज्युकेशन, केज.संत भगवानबाबा एम एड कॉलेज केज.श्री गुरु वीरूपाक्ष शिवाचार्य महाराज आर्टस् कॉलेज मानूर.आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अंमळनेर.एस. एस. पी. एम. एस.आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, धानोरा.राजीव गांधी आर्टस्, सायन्स कॉलेज रायमोह.गुरुकुल कॉलेज ऑफ एज्युकेशन बीड.महात्मा ज्योतिबा फुले कॉलेज ऑफ कॉम्पुटर सायन्स अँड इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी, चौसाळा.संभाजीराजे कॉलेज ऑफ लायब्ररी अन मॅनेजमेंट सायन्स, बीड.तुलसी कॉलेज ऑफ कॉम्पुटर सायन्स अँड आयटी बीड.छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ कॉम्पुटर सायन्स अँड मॅनेजमेंट.गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन अंबाजोगाई.आदित्य कॉलेज ऑफ एज्युकेशन बीड.श्री मोरेश्वर कॉलेज गंगामसला ता माजलगाव.स्वामी विवेकानंद कॉलेज परळी.श्री तांबवेश्वर कॉलेज ऑफ कॉम्पुटर सायन्स अँड इन्फॉर्मशन टेक्नॉलोजी केज.आर्टस् अँड सायन्स कॉलेज आष्टी.पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अध्यापक महाविद्यालय गढी.आर्टस् अँड सायन्स कॉलेज चकलंबा.छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी बीड.संत भगवानबाबा आर्टस् अँड सायन्स कॉलेज, घाटशिल पारगाव.स्व. शंकरराव गुट्टे ग्रामीण आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज धर्मापुरी.जीवनदीप आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पिंपळनेर.वसंतराव काळे कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड कॉम्पुटर सायन्स बीड.शाम गदळे आर्टस् कॉलेज दहिफळ.त्वरितापुरी आर्टस् अँड सायन्स कॉलेज तलवाडा.नालंदा कॉलेज ऑफ कॉम्पुटर सायन्स आष्टी.स्व रामचंद्र दादा धस सिनियर कॉलेज,देऊळगाव घाट आष्टी.पदमश्री अप्पासाहेब पवार सिनियर कॉलेज बरदापूर.कॉलेज ऑफ फार्मास्युटीकल सायन्स अँड रिसर्च आष्टी.मराठवाडा कॉलेज ऑफ इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी बीड.गुरुकृपा इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी माजलगाव.किशोरी कॉलेज ऑफ एम बी ए बीड.सुरज इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट बीड.मिठूलालजी सारडा कॉलेज ऑफ एम बी ए बीड.आर्टस् अँड सायन्स कॉलेज मारफला.जीवन शिक्षण सायन्स कॉलेज केज.
Leave a Reply