बीड -जिल्हा प्रशासनाने बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदूसरा नदी पात्राची स्वछता आणि सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा शुभारंभ बीडचे आ संदीप क्षीरसागर आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते झाला. यावेळी आ क्षीरसागर यांनी या कामासाठी आपल्या निधीतून पंचवीस लाख रुपयांची तरतूद केली.
बीड शहरातून जाणाऱ्या बिंदू बिंदुसरा नदीपात्रात स्वच्छता आणि खोली करण्याच्या कामाचा आमदार संदीप क्षीरसागर व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला असून प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. बिंदुसरा नदीच्या खोलीकरणामुळे शहरातील पाणी पातळीत मोठी वाढ होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
बीड नगरपालिकेच्या वतीने, शहरात असलेल्या बिंदुसरा नदीपात्रात खोलीकरण ठाणे स्वच्छतेच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आली असून कामाचा शुभारंभ आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, माजी आमदार सय्यद सलीम, बीड नगरपालिकेच्या प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी कविता जाधव, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे, नायब तहसीलदार सुहास हजारे यांच्यासह संबंधित अधिकारी कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती.
आ.क्षीरसागरांकडून तातडीने आर्थिक तरतूद
बिंदुसरा नदीपात्राचे खोलीकरणाचे आणि स्वच्छता काम परिपूर्णतेने आणि प्रभावी व्हावे याकरिता जिल्हाधिकारी व प्रशासनाकडून आर्थिक तरतूदीचा विषय काढताच आ.संदीप क्षीरसागर यांनी स्वेच्छेने आपल्या स्थानिक विकास निधीतून २५ लक्ष रूपयांची तातडीने तरतूद केली.
Leave a Reply