नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी खा सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड स्वतः पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवी मेळाव्यात पवारांनी ही घोषणा केली.
शरद पवार यांनी महिनाभरापूर्वी अचानक पुस्तक प्रकाशन सोहळ्यात निवृत्तीची घोषणा केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे पवारांनी आपला निर्णय मागे घेतला.त्यानंतर पक्षात कार्याध्यक्ष पद निर्माण केले जाईल अशी चर्चा होती.
दरम्यान 10 जून रोजी पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात शरद पवार यांनी खा सुळे आणि पटेल यांच्या नावाची घोषणा केली.विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्यावर देण्यात आली आहे.
Leave a Reply