बीड -राज्यात सत्तेत असलेल्या आणि ज्यांच्या हाती अर्थ खात्याच्या चाव्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपच्या वतीने आज पाण्यासाठी नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा काढणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी जर आपल्या नेत्याकडे वीज जोडणीसाठीचे पैसे मागितले असते तर आजपर्यंत दररोज बीड वासियांना पाणी मिळाले असते अशी चर्चा या मोर्चा नंतर सुरु झाली आहे.
बीड शहर वासियांना पुरेसे पाणी उपलब्ध असून देखील वेळेवर पाणी पुरवठा होतं नाहीये. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नगर परिषद आणि वीज वितरण कंपनी यांच्या घोळामुळे बीडकर पाण्यापासून वंचित आहेत.
माजलगाव बॅक वॉटर योजनेच्या कवडगाव येथील पम्प हाऊस मध्ये मुबलक पाणी उपलब्ध आहे. मात्र इट येथील फिल्टर प्लॅन्ट येथे असलेल्या नव्या 25 एम एल डी योजनेसाठी वीज जोडणी झालेली नाही. कारण वीज वितरण कंपनीचे चाळीस कोटी थकीत आहेत. त्यामुळे पाणी असून मिळतं नाहीये.
पाण्याच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांनी नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढला. मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिला अनैतिक नागरिक सहभागी झाले होते.
मात्र सत्तेत असलेल्या लोकांनीच आपल्याच सरकार विरुद्ध हा मोर्चा काढल्याची चर्चा शहरात होती. राज्याचे अर्थमंत्री हे अजित पवार आहेत. तेच बीडचे पालकमंत्री आहेत, शहराला महिन्यातून एकवेळ पाणी पुरवठा होतो हे देखील त्यांना माहित आहे.अशावेळी मोर्चा काढणाऱ्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याकडे म्हणजेच पालकमंत्री पवार यांच्याकडे वीज वितरण ची थकबाकी भरण्यासाठी आग्रह केला असता तर महिना भरपूर्वीच पाणी पुरवठा सुरळीत झाला असता.
असे असतानाही मोर्चा काढण्याची गरज का पडली अशी चर्चा सुरु झाली आहे.
Leave a Reply