नवी दिल्ली -भारत पाकिस्तान मधील वाढता तणाव आणि युद्धजन्य परिस्थिती मुळे आयपीएल चे उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय बिसिसीआय ने घेतला आहे.
आता आजपासून आयपीएल १८ च्या हंगामातील एकही सामना खेळवला जाणार नाही. बीसीसीआयने अधिकृत माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या या निर्णानंतर जपासून आयपीएल १८ (IPL) च्या हंगामातील एकही सामना खेळवला जाणार नाही. बीसीसीआयने अधिकृत माहिती दिली आहे.
आयपीएलच्या चालू हंगामात एकूण ५७ सामने खेळले गेले आहेत. दरम्यान, ५८ वा सामना काल (दि.8) धर्मशाळामध्ये सुरू होता. पण पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर हा सामना मध्येच थांबवण्यात आला. यंदाच्या हंगामात एकूण ७४ सामने खेळवले जाणार होते, २५ मे रोजी कोलकाता येथे अंतिम सामना खेळवला जाणार होता. पण, आता भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव लक्षात घेता BCCI ने यंदाचे आयपीएलचे सर्व उर्वरित सामने अनिश्चितकाळासाठी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Leave a Reply