बीड – पावसाळ्याच्या पूर्वी शहरातील नालेसफाई, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन करणे तसेच बीड नगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी चतुर्थ कर आकारणी (टॅक्स रिव्हीजन) करण्यासाठी सुव्यवस्थित करणे तसेच बीड शहरातील नगर रोडवर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुना नगर नाका यांमध्ये रस्ता क्रॉसिंग अशा विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आ.संदीप क्षीरसागर यांनी बुधवारी (दि.७) रोजी जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली.
बीड शहरात पावसाळ्याच्या अगोदर नालेसफाई, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी कामे होणे गरजेचे आहे. जेणेकरून नागरिकांचे आरोग्य आणि शहरातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होणार नाही. यासोबतच बीड नगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी चतुर्थ कर आकारणी (टॅक्स रिव्हीजन) होणे अत्यंत गरजेचे आहे. त्याबाबत सुव्यवस्थित नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. यासोबतच नगर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुना नगर नाका यादरम्यान सर्व शासकीय कार्यालये आहेत. परंतु याठिकाणी एकही रस्ता क्रॉसिंग नाही त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. बीड शहाराच्या अनुषंगाने या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. दरम्यान पावासाळ्यापूर्वी स्वच्छतेची कामे करण्यासाठी योग्य नियोजन करण्याबाबत तसेच नगरपालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी चतुर्थ कर आकारणी (टॅक्स रिव्हीजन) च्या संदर्भात आराखडा तयार करून त्याचेही सुव्यवस्थित नियोजन करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी नगरपालिका प्रशासनाला सूचित केले. यासोबतच नगर रोडवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक रस्ता क्रॉसिंग करण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. या बैठकीस आ.संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, माजी आ.सय्यद सलीम व नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply