News & View

ताज्या घडामोडी

भारताचा पाकिस्तान मध्ये घुसून हल्ला!

नवी दिल्ली -पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा(Pahalgam Terror Attack) भारतीय लष्कराने बदला घेतला आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे, ज्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. या हल्ल्यात एकूण नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, जिथून दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि निर्देश केले जात होते.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. या हल्ल्यात एकूण नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते, जिथून दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि निर्देश केले जात होते. भारतीय वायुसेनेकडून बुधवारी (ता.7) रात्री पावणेदोनच्या सुमारास ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु करण्यात आले.

या हल्ल्याबाबत संरक्षणखात्याकडून माहिती देण्यात आली आहे.काही वेळापूर्वी, भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’सुरू केले, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला.ज्याठिकाणाहून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांचं प्लॅनिंग केले जात होते.

भारताने स्ट्राइकची घोषणा केल्यानंतर काही मिनिटांतच, भारतीय लष्कराने ट्विटरवर पोस्ट केले, “न्याय झाला. जय हिंद.” एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यांनी पाकिस्तानी हद्दीत मुझफ्फराबाद, कोटली आणि बहावलपूरमधील अहमद पूर्व भागात तीन ठिकाणी लक्ष्य केले असल्याची पुष्टी पाकिस्तानी लष्कराने बुधवारी केली. या हल्ल्याबाबत माहिती देण्यात आली आहे.

भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईत एकूण 9 स्थळांना लक्ष्य करण्यात आले आहे. तसेच भारतीय वायुसेनेकडून यावेळी कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष्य करण्यात आले नाही. लक्ष्यांची निवड आणि अंमलबजावणीच्या पद्धतीत भारतानं बराच संयम दाखवल्याचंही यावेळी संरक्षण खात्यानं म्हटलं आहे.

तसेच पहलगाम येथील क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले असल्याचंही नमूद केलं आहे.ज्यामध्ये 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाची हत्या करण्यात आली होती.या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही ही कारवाई केल्याचंही सांगण्यात आले आहे.या ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *