बीड -पोलीस अधीक्षक यांच्या शासकीय निवासस्थानी गांजा ओढणारा आणि वाळू तस्कराला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सेवेतून बडतर्फ केले आहे.
बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्यापासून नवनीत कावत यांनी पोलीस दलात शिस्त लावण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. पोलीस दलावर आरोप करणारा पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले असो कि इतर त्यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई करत बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही असा ईशारा कावत यांनी दिला होता.
दरम्यान दोन दिवसापूर्वी पोलीस अधीक्षक यांच्या शासकीय निवासस्थानी गांजा ओढणाऱ्या पोलीस कर्मचारी बहिरवाळ याला तसेच वाळू माफियाच्या संपर्कात राहून त्याला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या रामप्रसाद कडुळे या दोघांना कावत यांनी थेट बडतर्फ केले आहे.
पोलीस अधीक्षक यांनी घेतलेल्या या एक्शनमुळे कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत.












Leave a Reply