बीड -नगर पालीकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे या गेंड्याच्या कातडीच्या आहेत कि काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बीड शहर वासियांना महिना महिना पाणी मिळतं नाहीये, शहरात सगळीकडे कचऱ्याचे ढीग साचले आहेत, कोट्यावधी रुपयांची बोगस बिल उचलली जातं आहेत, तरीही नीता अंधारे यांना काहीच कसं वाटतं नाही असं म्हणत पेपरवाल्यानी त्या गेंड्याच्या कातडीच्या आहेत अशा बातम्या केल्या त्यावरून त्यांना काहीच फरक पडला नाही मात्र गेंड्याला फारच राग आला. कारण त्याची तुलना अंधारे यांच्याशी केल्याने त्याचा अपमान झाला. आता काय म्हणावं सांगा.
बीड शहरावर म्हणजेच नगर पालिकेवर गेल्या चार वर्षांपासून प्रशासक राज आहे. गुट्टे, ढाकणे यांच्यानंतर मुख्याधिकारी म्हणून रुजू झालेल्या नीता अंधारे या आतापर्यंत च्या इतिहासातील सगळ्यात वाईट अन बदनाम, कामचुकार सिओ असल्याची नोंद झाली आहे.
केवळ मला पहा अन फुल वहा अशी अवस्था त्यांच्याबाबतीत झाली आहे. बीड शहरात महिन्याला पाणी पुरवठा होतं आहे. नगर पालिकेकडे कोणीही तक्रार केली तर मुख्याधिकारी नीता अंधारे या ही जबाबदारी आमच्याकडे नाही म्हणत हात झटकतात हा नेत्यापासून ते सर्वसामान्य माणसापर्यंत प्रत्येकाचा अनुभव आहे. माणसं पाणी पाणी करून जीव सोडत असताना अंधारे बाई मात्र मूग गिळून गप्प आहेत.
नगर पालिकेतील कर्मचारी गणेश पगारे याच्या भ्रष्ट कारभाराच्या अनेक तक्रारी या सिओ अंधारे यांच्याकडे आमदारांपासून ते सर्वसामान्य नागरिक यांनी केल्या. मात्र त्याच्यावर कसलीच कारवाई अंधारे यांनी केली नाही. उलट त्याच्या मदतीने स्वतःच्या भावाला गुत्तेदार म्हणून कोट्यावधी रुपये मिळवून दिले. पगारे आणि आ क्षीरसागर वादानंतर त्याची बदली झाली मात्र त्याला अद्याप अंधारे यांनी कार्यमुक्त केलेलं नाही. यावरून केवळ पैसा कमावून देणारे अंधारे यांच्यासाठी महत्वाचे आहेत, बाकी सर्वसामान्य माणूस आणि त्याच्या मूलभूत गरजा यांच्याशी त्यांना देणंघेणं नाही असच दिसू लागलं आहे.
पाण्यासोबतच शहरात सगळीकडे कचऱ्याचे ढीग साचले आहेत. स्वच्छ बीड सुंदर बीड असे बोर्ड लिहिलेल्या ठिकाणी सुद्धा कचरा साठला आहे. स्टेडियम रोड असो कि भाजी मंडई, नगर रोड असो कि नाट्यगृह, बसस्टॅण्ड असो कि मालिवेस, पेठ बीड असो जुना मोंढा सगळीकडे कचऱ्याचे ढीग रस्त्यावर असल्याचे दिसून येतात.
मुख्याधिकारी नीता अंधारे यांना आष्टीचे आ सुरेश धस यांचे पाठबळ असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या विरोधात कोणीही तक्रार केली तरी कसलीच कारवाई होतं नाही कारण आ धस हे त्यांची बाजू मंत्रालयीन पातळीवर सांभाळून घेतात अशी देखील चर्चा होते.
बीड शहरात घाणीचे साम्राज्य असताना आणि पाण्याविना लोकांचा जीव जातं असताना प्रशासन म्हणून नीता अंधारे या फेल ठरल्या आहेत. त्यांच्याबद्दल कितीही लिहा, कितीही टीका करा त्यांना फरक पडत नाही, त्या गेंड्याच्या कातडीच्या आहेत कि काय अशी शंका येते. मात्र त्यांना असं म्हणल्यामुळे गेंडा नाराज झाल्याचे काही प्राणी मित्रांनी सांगितले. आता सांगा काय करायचे. टीका केल्यावर जर का गेंड्याला राग येतं असेल तर अंधारे बाईंना कधीतरी राग येऊन त्या प्रशासनात सुधारणा करणारं का अशी चर्चा सुरु झाली आहे.
Leave a Reply