दोन दिवसानंतर आठवड्यातून एकदा मिळणार पाणी!
बीड -तीन साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या बीड शहराला महिन्यातून एकवेळ पाणी पुरवठा होतो आहे. याला जबाबदार कोण? लोकप्रतिनिधी, प्रशासन कि सरकार यावरून बीड शहर वासीय कन्फ्यूज आहेत. माजलगाव आणि बिंदूसरा धरणात मुबलक पाणी उपलब्ध असताना सुद्धा महिन्याला पाणी मिळणे मुश्किल का झाले आहे आणि लोकप्रतिनिधी काहीच करत नाहीत का असा प्रश्न ज्यांना ज्यांना पडतो ना त्यांनी एकदा का होईना माजलगाव ते बीड पाणी पुरवठा योजनेत नेमक्या काय काय अडचणी आहेत हे प्रत्यक्ष जाऊन पाहायलाच हवे. चाळीस बेचाळीस डिग्री तापमानात सडलेली, अडवलेली पाईप लाईन दुरुस्त करून घेण्यासाठी आ संदीप क्षीरसागर आणि माजी आ सय्यद सलीम हे जेव्हा दिवस रात्र उभा राहून काम करून घेतात ना तेव्हा कळते कि पाणी कुठं मुरतंय अन क्रेडिट साठी कोण पाणी पुरवठ्यात अडचणी आणतय ते.

हा फोटो आहे कवडगाव ते देवडी या रस्त्यावर वीस वर्ष जुन्या झालेल्या आणि सडलेल्या पाईप लाईनच्या कामाचा. तब्बल तेराशे मीटर पाईप लाईन सडली आहे. त्यातील साडेसातशे मीटर पाईप लाईन नव्याने जोडण्याचे काम आ क्षीरसागर यांनी करून घेतले आहे.

दिवसा जीव जाळणारे आणि होरपळून टाकणारे ऊन असतानाही आ संदीप क्षीरसागर हे दररोज या कामावर जाऊन आढावा घेत काम करून घेत असल्याचे या फोटोवरून लक्षात येते.

केवळ दाखवण्यासाठी दिवसा एखादी चक्कर मारायची असे नाही तर रात्री अपरात्री सुद्धा आ क्षीरसागर आणि सय्यद सलीम हे कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करत असल्याचे यावरून दिसून येते.

1999 मध्ये टाकण्यात आलेले माजलगाव बॅक वॉटर योजनेचे पाईप देखभाल दुरुस्ती ण झाल्याने तेराशे मीटर एवढे सडून गेले आहेत. 75 ठिकाणी असलेल्या पाण्याच्या वॉल पैकी 35 लिकेज वॉल दुरुस्त केले आहेत. ज्यामुळे लिकेजद्वारे वाहून जाणारे किमान वीस लाख लिटर पाणी वाचणार आहे. जे शहरातील दहा वार्ड मधील नागरिकांची तहान भागवू शकते.
बीड शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडवता यावा यासाठी आ संदीप क्षीरसागर यांनी राज्य सरकारकडे वीज बिलासाठी चाळीस कोटीच्या निधीची मागणी केली. सुरवातीला याबाबत सकारात्मक असलेल्या पालकमंत्री अजित पवार यांचे कोणीतरी कान भरले आणि त्यांनी हा निधी देण्यासाठी नकार दिला. त्यामुळे एक दिवसा आड होऊ शकणारा पाणी पुरवठा महिन्यावर गेला. यामागे केवळ ण केवळ राजकारण असून बीडचा लोकप्रतिनिधी विरोधी पक्षांचा असल्याने त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.
माजलगाव धरणाच्या ज्या भागातून पाणी उपसा केला जातो त्या कवडगाव येथील पाणी खेचणाऱ्या मोटार नादुरुस्त होत्या, त्या चालू करण्यासाठी देखील आ क्षीरसागर यांनी स्वतःच्या खिशातून पैसे घातले.
शहर वासियांच्या पाण्याच्या प्रश्नावर कोणीच बोलत नाही असं सगळेच म्हणतात मात्र गेल्या दीड दोन महिन्यापासून सडलेली पाईप लाईन बदलण्यापासून ते लिकेज काढण्यापर्यंत जेवढा पाठपुरावा आ क्षीरसागर आणि सय्यद सलीम यांनी केला आहे. तो प्रत्यक्षात स्पॉट वर जाऊन पाहिल्यानंतर कळते.
फक्त पत्रक काढायचे, नेत्यांचे मोठं मोठे बॅनर लावायचे आणि फोटो छापून आणत चमकोगिरी करायची अशा सो कॉल्ड लोकप्रतिनिधी यांनी रनरणत्या उन्हात एकदा जाऊन पाहणी करावी अन मग पत्रक काढावे.
Leave a Reply