सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. ग्रिष्म
🚩 उत्तरायण 🌕 वैशाख अष्टमी
🌸 नक्षत्र… आश्लेषा
🌸 वार.. सोमवार
🌼 दिनांक….. ०५ मे २०२५
🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०५/५३ मि.
🌘 सुर्यास्त ०६/५४ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी मंथन‼️
. ‼️दिनांक ०५ मे २०२५‼️
मेष:- चंद्राचा बुधाशी त्रिकोण , गुरुशी लाभ योग आहे. सामाजिक कार्यातून लाभ होतील. नावलौकिक वाढेल. मानसिक क्लेश कमी होतील. धैर्य वाढेल.
वृषभ:- तुमच्या राशीतील हर्षलशी चंद्राचा दुपारनंतर केंद्र योग होणार आहे. सकाळच्या सत्रात महत्वाची कामे पूर्ण करा. व्यवसाय वाढेल. प्रगती साध्य होईल.
मिथुनः- अनुकूल बुध, रवी उत्साह प्रदान करतील. बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. वक्तृत्व चमकेल.
कर्क:- तुमच्याच राशीत सकाळी चंद्र आहे. काही अडचणी दूर होतील. स्वप्ने पूर्ण होतील. दिवस सत्करणी लावा. प्रवास घडतील.
सिंह:- संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. आध्यत्मिक लाभ होतील. नोकरीच्या ठिकाणी कटू अनुभव येऊ शकतात.
कन्या:- सकाळच्या सत्रात अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक लाभ होतील. प्रतिष्ठा जपण्यासाठी खर्च करावा लागेल.
तुळ:- आर्थिक लाभ होतील. नोकरीत नवीन संधी मिळतील. कामानिमित्त प्रवास घडतील. सुसंवाद वाढेल. अष्टम स्थानी हर्षल आहे. काळजी घ्या.
वृश्चिक:- अनुकूल चंद्र आहे. स्पर्धेत यश मिळेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. गूढ उलगडतील. शत्रूचा त्रास जाणवेल.
धनु:- संमिश्र दिवस आहे. सुरुवात फारशी चांगली नाही. उत्तरार्ध अनुकूल आहे. पत्नीची काळजी घ्या. दानधर्म करण्यास उत्तम दिवस आहे.
मकर:- संमिश्र दिवस आहे. जुने वाद मिटवा. संयमाची भूमिका घ्या. प्रेमात अपयश संभवते. शेअर्स मध्ये जपून पावले टाका.
कुंभ:- आर्थिक लाभ होतील. शेतीतून उत्तम फायदा होऊ शकतो. व्यवसाय वाढेल. घरगुती कटकटिना सामोरे जावे लागू शकते.
मीन:- पंचम आणि षष्ठ चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. स्पर्धेत यश मिळेल. छोटे प्रवास घडतील. गैरसमज टाळा.
Leave a Reply