अंबाजोगाई- चनई ते आडस दरम्यान कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन डॉक्टर ठार झाल्याची घटना दुपारी बारा च्या दरम्यान घडली.या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
अंबाजोगाई कडे निघालेल्या डॉ प्रमोद बुरांडे आणि डॉ रवी सातपुते यांच्या एम एच 44 एस 3983 या कारवरील ताबा सुटल्याने कार झाडावर जाऊन आदळली. यामध्ये डॉ बुरांडे हे जागीच ठार झाले तर डॉ सातपुते यांच्या वर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात कारचा समोरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.
Leave a Reply