सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. ग्रिष्म
🚩 उत्तरायण 🌕 चैञ कृष्ण द्वादशी
🌸 नक्षञ… पूर्व भाद्रपदा
🌸 वार.. शुक्रवार
🌼 दिनांक….. २५ एप्रिल २०२५
🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/१० मि.
🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी मंथन‼️
. ‼️ दिनांक २५ एप्रिल २०२५ ‼️
मेष:- चंद्राचा मंगळाशी शुभ त्रिकोण योग आहे. मात्र व्यय स्थानी चंद्र आहे. काही सुखद अनुभव येतील. नव्याने उत्साह निर्माण होईल. संमिश्र दिवस आहे. खर्चात वाढ होईल. वाहन जपून चालवा.
वृषभ:- दिवसाची सुरुवात अत्यंत अनुकूल आहे. उच्च शिक्षण, दूरचे प्रवास यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. मात्र सरकारी नियम काटेकोर पाळावेत अन्यथा दंड होऊ शकतो.
मिथुन:- अनुकूल दिवस आहे. नैतिक मार्ग सोडू नका. नोकरीत स्थिरस्थावर होणास साहाय्यभूत ग्रहमान आहे.
कर्क:- अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. सर्व स्वप्ने साकार होतील. वेळ ‘न’ दवडता कामाला लागा. दूरचे प्रवास घडतील.
सिंह:- संमिश्र ग्रहमान आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. काळजी घ्या. मोठी जोखीम नको.
कन्या:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक भरभराट होईल. गूढ उलगडतील.
तुळ:- व्यवसायात भरभराट होईल. अधिकार वाढतील. घरगुती कामासाठी वेळ द्यावा लागेल. भागीदाराशी मतभेद होऊ शकतात.
वृश्चिक:- आर्थिक दृष्टीने यश देणारा कालावधी आहे. शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करा. सरकारी कामात प्रगती होईल.
धनु:- कौटुंबिक सौख्य लाभेल. वास्तू संबंधित अडचणी दूर होतील. पशु लाभ होईल. सरकारी कामे रेंगाळतील.
मकर:- अनुकूल ग्रहमानाचा लाभ उठवा. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. कोर्ट कामात अनुकूलता वाढेल. शत्रू पराभूत होतील.
कुंभ:- संमिश्र दिवस आहे. योग्य करणासाठी खर्च कराल. धन धान्य वाढेल. शब्दावर नियंत्रण ठेवावे लागेल.
मीन:- तुमच्या राशीत चंद्र आहे. अनुकूल ग्रहमान आहे. शक्य ती सर्व कामे पूर्ण होतील. बौद्धिक लेखनात लाभ होतील.












Leave a Reply