नवी दिल्ली -पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान ला धडा शिकवण्याच्या दृष्टीने कठोर निर्णय घेतले आहेत.सिंधू पाणी करार रद्द करण्यासोबतच आटारी बॉर्डर सील केली असून भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे फर्मान देण्यात आले आहे. भारताने घेतलेल्या या निर्णयामुळे पाकिस्तान ची मोठी अडचण होणार आहे.
अतिरेकि हल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण दलातील तिन्ही सेनादलाच्या अधिकाऱ्यासोबत आणि परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी काश्मीर मध्ये भेट दिली.
या घटनेनंतर जगभरातून संपात व्यक्त होत होता. मोदी सरकारी कोणतं कठोर पाऊल उचलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर मोदींनी सीसीएसची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये पाच कठोर निर्णय घेण्यात आलेले आहेत. पाकिस्तानवर एक प्रकारे कायदेशीर स्ट्राईक भारताने केला आहे. बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली.
भारत सरकारचे पाच मोठे निर्णय
१९६० साली लागू झालेला सिंधू पाणी करार भारताने स्थगित केला आहे. पाकिस्तानवर याचा मोठा परिणाम होणार आहे.अटारी बॉर्डर बंद करण्यात आलेली आहे. भारतीय नागरिक पाकिस्तानमध्ये असतील तर त्यांनी १ मेपर्यंत माघारी यावं, असं आवाहन करण्यात आलेलं आहे.पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसा बंद करण्यात आलेला आहे.एका आठवड्यामध्ये भारतात असलेल्या पाकिस्तानी राजकीय अधिकाऱ्यांनी देश सोडावा, असे आदेश देण्यात आलेले आहेत.भारतातील पाकिस्तानी उच्चायोग बंद करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांना पाकिस्तानात माघारी जाण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
Leave a Reply