News & View

ताज्या घडामोडी

जिल्हाधिकारी बीड

जिल्ह्याला मिळाले दोन अप्पर जिल्हाधिकारी!

बीड -गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी पदावर हरीश धार्मिक यांची तर अंबाजोगाई च्या अप्पर जिल्हाधिकारी पदावर अश्विनी सोनवणे जिरंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यातील बीड आणि अंबाजोगाई येथील दोन्ही अप्पर जिल्हाधिकारी यांची पदे गेल्या काही महिन्यापासून रिक्त होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर जिल्ह्यातील पदांचा अनुशेष भरून काढण्यास सुरवात केली आहे.

बीडच्या रिक्तपदावर हरीश धार्मिक यांची तर अंबाजोगाई येथे अश्विनी सोनवणे जिरंगे यांची नियुक्ती झाली आहे. शासनाने उपजिल्हाधिकारी संवर्गातील या अधिकाऱ्यांना पदोन्नती ने या पदावर नियुक्ती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *