News & View

ताज्या घडामोडी

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 चैञ कृष्ण प्रतिपदा / डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती
🌸 नक्षञ… स्वाती
🌸 वार… सोमवार
🌼 दिनांक….. १४ एप्रिल २०२५
🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/१० मि.
🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी मंथन‼️
.‼️दिनांक १४ एप्रिल २०२५‼️
.

मेष:- दिवसाची सुरुवात संथ आहे. व्यवसाय वाढेल. मात्र खर्च वाढतील. मन अस्वस्थ राहील. शत्रूचा त्रास जाणवेल.

वृषभ:- उद्योग व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. दूरचे प्रवास संभवतात. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल.

मिथुन:- बोलताना काळजी घ्या. कोणासही जामीन राहू नका. नवीन काहीतरी शिकायला मिळेल. अभ्यासात मन रमेल.

कर्क:- सरकारी नियमाचे काटेकोर पालन करा. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी वाटेल.

सिंह:- व्यवसाय वाढेल. नेहमीची कामे चालू ठेवा. चुकीच्या निर्णयामुळे खर्च वाढेल.

कन्या:- कामाचे नियोजन बदलेल. संयम ठेवावा लागेल. नवीन संधी चालून येतील. आरोग्य तपासणी करणे हिताचे ठरेल.

तुळ:- सुरुवात फारशी अनुकूल नाही. मात्र नंतर काही चांगल्या घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी अधिक मेहनत करावी लागेल. वरिष्ठ नाराज होऊ शकतात.

वृश्चिक:- काहीसा अनुकूल दिवस आहे. सामाजिक कार्यातून विनाकारण त्रास होऊ शकतो. राजकीय भाष्य टाळा.

धनु:- संमिश्र दिवस आहे. सुरुवात फारशी वेगवान नसली तरी उत्तरार्ध अनुकूल आहे. मात्र आजचा दिवस खर्चात टाकणारा असणार आहे.

मकर:- कामाचा पसारा वाढेल. अचानक एखादे नवीन काम अंगावर येऊ शकते. वादविवाद संभवतात.

कुंभ:- अडचणी दूर होऊ लागतील. अभ्यासात यश मिळेल. प्रवास घडतील. मंगळाची अनुकूलता असली तरी आज अपेक्षित लाभ मिळणार नाहीत.

मीन:- दिवसाची सुरुवात आशादायक आहे. कामे मार्गी लागतील. अष्टम स्थानी चंद्र आहे. विनाकारण खर्च वाढतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *