बीड-गेल्या 141 वर्षापासून अखंडितपणे पारंपारिक पद्धतीने चकलांबा या गावात चैत्र पौर्णिमेनिमित्त श्री रोकडेश्वर जयंती साजरी केली जाते यानिमित्त श्री रोकडेश्वर प्रसादिक नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग आयोजित केला जातो तीन दिवशीय असलेल्या या उत्सवासाठी रसिक प्रेक्षकांनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
चकलांबा या गावात गेल्या 141 वर्षापासून अखंडितपणे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सामाजिक कौटुंबिक ऐतिहासिक अशा विविध विषयावर नाट्यप्रयोगाचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे हा नाट्य प्रयोग गावातील नाट्यकलाकारच मोठ्या तयारीने सादर करत असतात.
ग्रामस्थांच्या वतीने ही या नाट्यप्रयोगाला मोठा प्रतिसाद मिळतो.यावर्षी दिनांक 11 एप्रिल रोजी छबिना होणार असून यानिमित्त श्री रोकडेश्वर महाराजांची गावातून पालखी मिरवणूक काढली जाणार आहे.रात्री उशिरापर्यंत गावातील तरुणांच्या सहभागातून गंगेचे पाणी कावडीद्वारे आणून गावातील मंदिरात जलाभिषेक केला जातो.
दिनांक 12 एप्रिल रोजी सूर्योदयाच्या समयी जयंती साजरी केली जाते तर दुपारी एक ते चार यादरम्यान महाप्रसादाचे आयोजन केले जाते पारंपारिक पद्धतीने चिठ्ठी टाकून यजमान निवडले जातात या यजमानांच्या हस्ते महारुद्राभिषेकही केला जातो. सायंकाळी सात वाजता नाट्यप्रयोगाची सुरुवात होते.
प्रारंभी रोकडेश्वर पंचपदी होऊन मग नाट्यप्रयोगाला सुरुवात होत असते या पंचपदीमध्ये विदूषक सरस्वती गणपती आणि सूत्रधार आणि पंचपदी गायक यांचा समावेश असतो.एक तासाच्या पंचपदीनंतर कलाकारांनी बसवलेले नाटक रसिक प्रेक्षकांसमोर सादर केले जाते, नाट्यप्रयोग संपल्यानंतर उत्तर रात्री श्री रोकडेश्वराची आरती करून रोकडेश्वर प्रसादिक नाट्य मंडळाच्या कलाकारांच्या वतीने दुसऱ्या दिवशी श्रमपरिहार केला जातो असा तीन दिवशीय उत्सव यावर्षी देखील होणार आहे.
यावर्षी गंगाराम गवाणकर लिखित आणि मच्छिंद्र कांबळी यांच्या कोकणी भाषेत सादर झालेल्या वस्त्रहरण या नाटकाचा प्रयोग अस्सल मराठवाडी भाषेत सादर होणार आहे हा नाट्यप्रयोग पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply