धारूर- मुलाचे लग्न अवघ्या तीन दिवसांवर आले असताना तीक्ष्ण हत्याराने वार करत वृद्धाचा खून करण्यात आल्याची घटना धारूर तालुक्यात उघडकीस आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथील दत्तात्रय रामा गायके वय 58 यांच्या मुलाचे तीन दिवसांनी लग्न होते.घरात लग्नाची गडबड,पाहुणे आलेले असताना बुधवारी पाहटे दत्तात्रय गायके यांच्यावर अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराने वार करत खून करण्यात आला आहे.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दत्तात्रय यांचा मृतदेह नजरेस पडल्यानंतर एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक पंकज कुमावत यांनी भेट दिली असून अधिक तपास सुरू आहे.घटनास्थळी गायके यांच्या जावयाची दुचाकी सापडली आहे.नेमकी ही हत्या का आणि कोणी केली याचा तपास पोलीस करत आहेत.
Leave a Reply