News & View

ताज्या घडामोडी

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 चैञ शुक्ल विनायकी चतुर्थी /अंगारकी योग
🌸 नक्षञ… भरणी
🌸 वार… मंगळवार
🌼 दिनांक….. ०१ एप्रिल २०२५
🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०६/३४ मि.
🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी मंथन‼️
. ‼️दिनांक ०१ एप्रिल २०२५‼️

मेष:- तुमचे प्रयत्न आणि झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे तुमच्या कुटुंबातील लोक तुमचे कौतुक करतील. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल.

वृषभ:- कौटुंबिक ताणतणाव दडपण गांभीर्याने घेण्याची गरज आहे. पण अनावश्यक काळजी तुमचा मानसिक ताण वाढवले. कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने त्यावर मार्ग काढता येईल. आपल्या करिअर संदर्भात महत्त्वाचा बदल करण्याचा काही काळापासूनचा आपला विचार अंमलात आणावयास हरकत नाही.

मिथुन:- आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका.

कर्क:- तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. पैसे मिळविण्याचा नव्या संधी लाभदायक असतील. तुमचे हे छोटेसे भावप्रदर्शनदेखील उत्साह वाढवू शकते. कृतज्ञता ही आयुष्याची खुमारी वाढवणारी असते आणि उपकार न मानणे हा दोष असतो.

सिंह:- चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस, अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. कुटुंबातील सदस्यांशी जवळिक साधून काम करा, आयुष्यातील चढ-उतार त्यांच्याशी शेअर करा. आपला हा बदललेला स्वभाव त्यांना अमर्याद आनंद मिळवून देईल.

कन्या:- अवश्यक तोच खर्च करा. आज तुम्हाला तुमच्या मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल. सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल.

तुला: – सर्वोत्कृष्टतेची अपेक्षा ठेवण्यासाठी स्वत:ला उत्तेजन द्या. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. तुमच्या जोडीदारासमवेत तुमचे विचार जमतील. वरिष्ठांकडून कौतुक झाल्यामुळे तसेच त्यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य आणि आत्मविश्वाास वाढेल.

वृश्चिक:- महत्वाच्या कामाच्या बातमीमुळे संपूर्ण कुटुंबाला आनंद देईल. वेळेला पैशाइतपतच असणारे महत्त्व तुम्ही जाणत असाल तर तुमच्या क्षमतेची उच्चतम पातळी गाठण्यासाठी आवश्यक ती पावले उचला.

धनु:- आपल्या स्वभावाचा परिणाम आयुष्याला हानीकारक ठरणार नाही याची दक्षता घ्या. तुमच्या व्यवहारात वास्तववादी राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या नियमित कष्टांचे आज चांगल चीज होईल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल.

मकर:- आपल्या वागण्या-बोलण्यात साशंकता ठेवू नका. शक्य झाल्यास सामोपचाराने समस्या सोडवा. तुमच्या अतिशय व्यस्त कामकाजाचा दिवस. सुयोग्य कर्मचार्‍यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल.

कुम्भ:- तुमचा हरवलेला उत्साह ऊर्जा परत मिळविण्यास सहाय्यभूत ठरतील अशा गोष्टींमध्ये मन रमवा. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे. क्रिएटीव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा.

मीन:- भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. तुमचा उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरेल. घरगुती तणाव सुकर करील. हितशत्रू तुमच्याविषयीच्या अफवा पसरविण्याची शक्यता आहे.
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *