गेवराई -उरूस मिरवणुकीत झालेल्या वादानंतर गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील मस्जिद मध्ये जिलेटिन च्या सहाय्याने स्फोट घडवण्यात आला. या प्रकरणी दोन आरोपीना ताब्यात घेण्यात आले असून नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केले आहे.
हा स्फोट नेमका का घडवला, याचं कारणही पोलिसांनी शोधून काढलं आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मशिदीत जाऊन जिलेटिनच्या कांड्या वापरून हा स्फोट घडवला आहे. हा स्फोट घडल्यानंतर अर्धमसला गावच्या सरपंचांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना देत अवघ्या २० मिनिटांत त्यांनी घटनास्थळ गाठलं. सरपंचाच्या सहकार्यामुळे आम्ही दोन्ही आरोपींना सकाळी सहा वाजता अटक केली. सर्वांनी शांततेत राहावे असे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केलं आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी सांगितलं की, मशीद स्फोट प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहेत. गावामध्ये शांतता आहे. बीड जिल्ह्यातील सर्व लोकांना आव्हान आहे की शांतता राखावी. झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे. पोलीस तत्पर आहे. लगेच पोलिसांनी येऊन दोन-तीन तासांमध्ये आरोपींना पकडले आहे. आम्ही आमच्या शंभर टक्के काम केले आहे. लोकांनी शांततेत राहावे. दोन्ही सण शांततेत सादरी करावेत, असं आवाहन कांवत यांनी केलं आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उरूस मिरवणुकीत झालेल्या किरकोळ वादातून हा स्फोट घडवल्याची माहिती समोर येत आहे. ज्यावेळी स्फोट घडवला, तेव्हा आरोपी दारूच्या नशेत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. गाव शांत आहे. घटनेनंतर मशीद स्वच्छ केली आहे. गावातील सगळे लोक एकत्रित राहत आहोत. कुठलाही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन गावातील मुस्लिम बांधवांनी केलं आहे.
Leave a Reply