बीड – तब्बल 28 वर्षाची परंपरा लाभलेल्या कनकालेश्वर महोस्तवात यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावरील नाटिका सादर केली जाणार आहे. नृत्य, नाटक,गवळण गायन आणि पखवाज वादनाने यावर्षी मराठी नववर्षाचे स्वागत केले जाणार आहे अशी माहिती संस्कार भारती बीडच्या संयोजकांनी दिली आहे.
संस्कार भारती बीड शाखेच्या वतीने गेल्या 28 वर्षांपासून कनकालेश्वर महोत्सव साजरा केला जातो चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात पाडव्याच्या दिवशी मराठी नववर्षाचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने कंकालेश्वर मंदिराच्या जलाशयामध्ये केले जाते. या जलाशयामध्ये पाण्यावर तरंगणारा रंगमंच तयार करून त्यावर वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात पुष्पवृष्टी करून हजारो नागरिकांच्या उपस्थितीत नववर्षाचे स्वागत केले जाते
राज योगिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे यंदाचे त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनपटावर आधारित एक नाटिका सादर केली जाणार आहे तसेच कृष्णा साळुंखे यांचे पखवाज वादन आणि साई नृत्यलय बीडच्या वतीने तरंगत्या रंगमंचावर नृत्यविष्कार सादर केला जाणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन युवा नेते योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते आणि पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे, भरत लोळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि स्नेहल पाठक यांच्या अध्यक्षेतेखाली होईल. या कार्यक्रमात संस्कार भारतीचे माजी महामंत्री कुलदीप धुमाळे यांचा अमृत महोत्सवी सत्कार करण्यात येणार आहे.
30 मार्च 2025 रोजी कंकालेश्वर मंदिर परिसरात होणाऱ्या या दिमागदार सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो बिडकर रसिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्कार भारती बीडच्या आयोजकांनी केले आहे.
Leave a Reply