बीड -दहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आणि राज्याच्या कानकोपऱ्यात शाखांचे जाळे उभारून कोट्यावधी रुपयांच्या ठेवी गोळा केलेल्या छत्रपती मल्टीस्टेट कडून ग्राहकांची फसवणूक झाली आहे. याबाबत अनेक ग्राहकांनी बीड आणि गेवराई च्या न्यायालयात धाव घेतली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
बीड जिल्ह्यात गेल्या वर्ष दीड वर्षांपासून जिजाऊ मा साहेब, ज्ञानराधा, साईराम सारख्या अनेक मल्टीस्टेट, पतसंस्था बंद पडल्या. लाखो ठेवीदारा चे कोट्यावधी रुपये अडकून पडल्याने अनेकांनी आत्महत्या देखील केल्या.
दरम्यान गेल्या वर्ष दीड वर्षांपासून ठेवीदारांना त्यांचे पैसे वेळेवर मिळतं नसल्यामुळे अडचणीत आलेल्या गेवराई च्या छत्रपती मल्टीस्टेट मध्ये देखील गडबड सुरु झाली आहे.
गेवराई आणि बीड न्यायालयात अनेक ठेवीदारानी आपले पैसे वेळेवर मिळतं नसल्याने गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे.
याबाबत मल्टीस्टेट च्या संचालक अथवा अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. परंतु अनेक ठेवीदारांनी वर्षभरापासून पैसे मिळण्यास अडचणी येतं असल्याचे सांगितलं आहे.
Leave a Reply