मुंबई -बीडचे जिल्हा शल्य चिकित्स्क डॉ अशोक थोरात यांचे विधानसभेत निलम्बन करण्यात आले. केजच्या आ नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ही कारवाई झाली. कोविड मधील घोटाळा याला जबाबदार असल्याचे सांगितलं जात असलं तरी विधानसभा निवडणुकीत डॉ थोरात यांनी केलेला विरोध हे मुख्य कारण असल्याची चर्चा आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात आपल्या कामाच्या जोरावर आणि शिस्तीच्या बळावर लोकप्रिय झालेले शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी कोरोना च्या काळात केलेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी त्यांच्यासह बारा अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु होती.
तत्कालीन सीएस डॉ थोरात, डॉ गित्ते, डॉ साबळे यांचा त्यात समावेश होता. मात्र आ नमिता मुंदडा यांनी केवळ डॉ थोरात याच्यावर कारवाई बाबत विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केली होती.
त्यावर चर्चे दरम्यान मंत्री महोदयानी डॉ थोरात यांच्या नीलम्बनाची घोषणा केली.
Leave a Reply