News & View

ताज्या घडामोडी

जिल्हा परिषदेचा आगळावेगळा अर्थसंकल्प!महिलांच्या दौऱ्यासाठी तसेच स्वच्छ कार्यालयासाठी विशेष तरतूद!

बीड -अधिकाऱ्याकडे व्हिजन असेल तर काहीतरी वेगळं करण्याचा तो प्रयत्न करतो. याचा प्रत्यय बीड जिल्हा परिषदेच्या आजच्या अर्थसंकल्पमधून आला. जिल्ह्यातील पन्नास सुपर महिला सरपंचाचा दौरा असो कि स्वच्छ कार्यालय यासाठी या अर्थसंकल्पत विशेष तरतूद करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागाच्या वतीने रमाई आवास साठी स्पर्धा घेऊन ही योजना कार्यान्वित करण्यात येईल. जिल्हा परिषदेचे सिइओ आदित्य जिवने यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

बीड जिल्हा परिषदेच्या 2025=26 या वर्षातील आरंभीची असेल ते सह एकूण महसुली जमा रुपये 16, 13,31, 102 इतकी असून प्रस्तावित खर्च 15 कोटी 21 लक्ष असून 91 लक्ष 43 हजार 102 इतका महसुली समितीच्या अर्थसंकल्पास आदित्य जीवने बीड जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्यता दिली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सोमवारी सदर माहिती सभागृहात दिली. यावेळी प्रकल्प संचालक संगितादेवी पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.


प्रारंभी मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे यांनी जिल्हा परिषदेच्या विभागनिहाय खर्चाच्या यावेळी बाबनिहाय तरतुद सादर केली. बांधकाम विभाग दोन कोटी 44 लक्ष 14 हजार, शिक्षण विभाग 1 कोटी 74 लक्ष 45000, आरोग्य विभाग 19 लक्ष 2000, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग 01 कोटी, समाज कल्याण विभाग 03 कोटी 51 लक्ष 10000, महिला व बालकल्याण विभाग 74 लक्ष 4000, कृषी विभाग 30 लक्ष 40 हजार, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग 74 लक्ष 3000, वनीकरण विभाग व व्याज 10,000, पंचायत राज कार्यक्रम विभाग 03 कोटी 93 लक्ष 56 हजार, लघु पाटबंधारे विभाग 10, 400, एकूण 15 कोटी 21 लक्ष 88,000 रुपयाच्या प्रस्ताविक खर्चास मान्यता देण्यात आली आहे.


यावेळी अर्थसंकल्प मांडताना मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी, ग्रामविकासासाठी बीड जिल्हा परिषद कटिबद्ध असून विविध महत्वकांक्षी निर्णय घेण्यात आले आहेत ग्रामपंचायतीचे सक्षमीकरण महिलांचे सबलीकरण, शिक्षण आणि आरोग्य विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची तरतुदीसह माहिती तसादर केली. जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागाच्या उपक्रमासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण विकासाच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठीच्या योजना राबविण्याचा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे.


यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी महसुली जमा व खर्चाच्या अंदाजपत्रकीय तरतुदीचे सविस्तर वाचन करून उपस्थित विभाग प्रमुख आणि पत्रकारांना सविस्तर माहिती दिली.


यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत डॉ. ज्ञानोबा मोकाटे, प्रकल्प संचालक राजेश मोराळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, प्रभारी कार्यकारी अभियंता बांधकाम (1), पशुसंवर्धन अधिकारी विजय देशमुख, आदीसह विभाग प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *