बीड -शहरातील प्रतितयश डॉक्टर के डी पाखरे यांचे हृदयविकाराने प्रयागराज येथे निधन झाले. आपल्या काही मित्रासमवेत ते दौऱ्यावर असताना ही दुर्घटना घडली. जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा सुशीलाताई मोराळे यांचे ते पती होते.
बीड शहरात आणि जिल्ह्यात नावाजलेले डॉ के डी पाखरे हे नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून सुपरिचित होते. आपल्या काही मित्रांसोबत ते प्रयागराज दौऱ्यावर होते. त्या ठिकाणी त्यांना अचानक हृदय विकाराचा त्रास झाला, उपचार सुरु करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
गेल्या तीस चाळीस वर्षेपासून बीडच्या सामाजिक चळवळीत योगदान देणाऱ्या प्रा सुशीलाताई मोराळे यांचे ते पती होते.त्यांना दोन मुले, पत्नी असा परिवार आहे.
Leave a Reply