News & View

ताज्या घडामोडी

डेपोडेशन वरील मास्तरांना शाळेवर पाठवा -सिइओ जिवने!

बीड- विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजी नगर यांच्या मान्यते शिवाय आपल्या अधिनस्त जे शिक्षक संवर्गातील कर्मचारी कार्यालयात प्रतिनियुक्ती वर कार्यरत आहेत त्यांच्या प्रतिनियुक्त्या तात्काळ रद्द करून आपल्या स्तरावरून मूळ पद स्थापनेच्या ठिकाणी हजर होण्याकरता तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे असे लेखीआदेश बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, व गटशिक्षणाधिकारी याना दिले आहेत.


सदर शिक्षकास कार्यमुक्त केले बाबा ची एक प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयास देण्यात यावी ,यानंतर हे शिक्षक आपल्या कार्यालयात प्रतिनियुक्तिवर असल्यास अथवा प्रतिनियुक्तीच्या ठिकाणाहून त्यांच्या मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी हजार न झाल्यास विद्यार्थ्यांचे होणाऱ्या शैक्षणिक नुकसानास आपण स्वतः जबाबदार राहाल अशा सूचना जिल्ह्यातील सर्व तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना पत्र क्रमांक जि. प .बी. /शिवी प्रा/ 1अ भाग-1 कावी/ 2025 य क्र 1329 दिनांक 18 मार्च 2025 चे आदेशान्वये करण्यात आले आहे.

सिइओ जिवने यांनी डेपोडेशन रद्द करण्याचे दिलेले आदेश स्वागतर्हाचं आहेत परंतु त्यांचसोबत जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभागात जवळपास तीनशे पेक्षा अधिक कर्मचारी हे देखील प्रतिनियुक्तीवर आहेत. ज्याला विभागीय आयुक्त यांची कसलीच परवानगी नाहीये. अशा कर्मचाऱ्यांना देखील त्यांच्या मूळ पदस्थापनेवर पाठवण्याची गरज आहे. ही कारवाई सिइओ यांनी तातडीने करावी अशी मागणी होतं आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *